सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाने मानवी नात्यांना, मर्यादांना आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांना अक्षरशः तडे जाताना दिसत आहेत. असाच एत धक्कादायक प्रकार बिहारच्या हाजीपूर येथून समोर आला आहे. इंस्टाग्रामवर सुरू झालेल्या प्रेमसंबंधाने एका विवाहित महिलेच्या आयुष्याची दिशाच बदलली. ही महिला इन्स्टाग्रामवर चॅटिंग करता करता आत्ये भावाच्याच प्रेमात पडली आणि तिने पतीसह पोटच्या तीन मुलांना वाऱ्यावर सोडत, त्याच्याशी कोर्ट मॅरेज केले.
नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण? - मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला इंस्टाग्रामच्या माध्यमाने आत्येभावाच्या संपर्कात आली. यानंतर दोघांचे इन्स्टाग्रामवर चॅटिंग सुरू झाले. हे प्रकरण एवढे वाढले की, दोघे एकमेकांच्या प्रेमा पडले. यानंतर, दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि तिने आपल्या पतीसह तीन मुलांना वाऱ्यावर सोडत प्रियकर आत्ये भावासोबत लग्नगाठ बांधली.
लहान मुलांचे सर्वाधिक हाल -या संपूर्ण प्रकारात, सर्वाधिक वाईट परिस्थिती झालीय, त्या लहान मुलांची. आईने वाऱ्यावर सोडल्यानंतर आता या मुलांची जबाबदारी त्यांच्या आजोबांवर, शंकर शाह यांच्यावर येऊन पडली आहे. कुंदनचे वडील शंकर शाह म्हणाले, त्यांचा मुलगा कधीच त्यांच्या ऐकण्यात नव्हता. त्याच्या वागणुकीमुळे त्याला घरापासून वेगळे करण्यात आले होते. तो स्वतःच स्वतःचे कमावून खात असे.
शंकर शाह पुढे म्हणाले, "संबंधित महिलेने नुकताच जन्म दिलेल्या एका मुलासह तिनही मुलांचा सांभाळ आता आपणच करत आहेत. ही मुले कुंदनची आहेत. म्हणून आपण सांभाळत आहोत. जंदाहा बाजार येथे त्यांचे 'लिट्टी' विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या मुलाच्या विचित्र वागण्यामुळे कुटुंबाने त्याला दूर केले आहे.
Web Summary : A married woman in Bihar left her husband and three children after falling in love with her cousin-brother on Instagram. They got a court marriage. The children are now being cared for by their grandfather.
Web Summary : बिहार में एक विवाहित महिला ने इंस्टाग्राम पर अपने चचेरे भाई से प्यार होने के बाद अपने पति और तीन बच्चों को छोड़ दिया। उन्होंने कोर्ट मैरिज कर ली। अब बच्चों की देखभाल उनके दादा कर रहे हैं।