सर्वात स्वस्त शहर कोणते? जगातील १७३ शहरांमधून भारतातील 'या' शहराची निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 06:44 IST2021-12-06T06:44:38+5:302021-12-06T06:44:52+5:30
जगभरातील एकंदर १७३ शहरांची सर्व्हे लिस्ट तयार करण्यात आली. या शहरांचा राहणीमानाचा निर्देशांक किती, हे पाहण्यात आले.

सर्वात स्वस्त शहर कोणते? जगातील १७३ शहरांमधून भारतातील 'या' शहराची निवड
ग्लोबल सर्व्हे इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने (ईआययू) अलीकडेच एक पाहणी केली. त्यात राहण्यासाठी सर्वात स्वस्त शहर कोणते, या विषयाचाही समावेश होता. या पाहणीनंतर दहा शहरांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात अहमदाबाद शहराचा समावेश आहे.
जगभरातील एकंदर १७३ शहरांची सर्व्हे लिस्ट तयार करण्यात आली. या शहरांचा राहणीमानाचा निर्देशांक किती, हे पाहण्यात आले. या पाहणीत बहुतांश युरोपीय आणि विकसित असलेल्या आशियाई देशांच्या शहरांमधील जीवनमान महाग असल्याचे
निदर्शनास आले. ईआययूने सर्व्हेसाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचा मार्केट डेटा संकलित केला.
राहण्यासाठी स्वस्त शहरे
- कराची (पाकिस्तान)
- ट्युनिस (ट्युनिशिया)
- अलमाटी (कझाकस्तान)
- दमास्कस (सीरिया)
- ताश्कंद (उझबेकिस्तान)
- अल्जिअर्स (अल्जेरिया)
- अहमदाबाद (भारत)
- ब्युनॉस आयर्स (अर्जेंटिना)
- लुसाका (झाम्बिया)
- त्रिपोली (लिबिया)