शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राहुल काँग्रेसच्या अध्यक्षपदी असो किंवा नसो, काय फरक पडणार? - लेखिका शोभा डे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 16:31 IST

राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडलं अथवा नाही सोडलं त्याने काय फरक पडणार? त्यांना जायचं असेल तर जाऊ द्या ना. मी त्यांच्याशी सहमत आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरुन सध्या देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मिडीयातही अनेकांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण यावरुन अनेक विनोद केले आहेत. अशातच लेखिका शोभा डे यांनीही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरुन केलेलं ट्विट सोशल मिडीयात चांगलचं गाजतंय. राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदी राहिले काय की गेले काय? याने काय फरत पडतो.  राहुल यांनी गेले पाहिजे, मी त्यांच्या मताशी सहमत आहे असं लेखिका शोभा डे यांनी सांगितलं आहे. 

शोभा डे यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडलं अथवा नाही सोडलं त्याने काय फरक पडणार? त्यांना जायचं असेल तर जाऊ द्या ना. मी त्यांच्याशी सहमत आहे. आता यु टर्न नको. सुट्टीचे दिवस त्यांनी कमविले आहेत. चौकीदारांनी त्यांचे काम करावे. भारत ते बघत आहे अशाप्रकारे शोभा डे यांनी राहुल गांधीसोबत चौकीदार शब्दावरुन मोदींनाही लक्ष्य केलं आहे. 

शोभा डे या नेहमी वेगवेगळ्या विषयांवर चर्चेचा विषय बनतात. काही दिवसांपूर्वी शोभा डे यांनी ट्विटमधून अरविंद केजरीवाल आणि लालूप्रसाद यादव यांना टीकेचं लक्ष्य बनवलं होतं. त्यांनी ट्विट केलं होतं की, सनी देओल जिंकला. हेमा मालिनी जिंकल्या. आप, आरजेडी आणि जेडीएसपेक्षा जास्त खासदार धर्मेंद्रच्या घरात आहेत. त्यावरुनही शोभा डे चर्चेत आल्या होत्या. 

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर दिल्लीत काँग्रेस कार्यकारणीची बैठक झाली. त्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र कार्यकारणी समितीने राहुल यांनी राजीनामा देऊ नये असा सल्ला दिला होता. जवळपास साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत पराभवावर चिंतन करण्यात आलं. या बैठकीत राहुल गांधी यांचा राजीनामा कार्यकारणी समितीच्या सदस्यांनी एकमताने फेटाळला असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली होती.  

लोकसभेमध्ये मी पक्षाचे नेतृत्व करण्यास तयार आहे. तसेच मी कुठल्याही अन्य भूमिकेमध्येही काम करण्यास तयार आहे. पक्षाला भक्कम करण्यासाठी मी काम करत राहीन. मात्र अध्यक्षपदावर राहणार नाही अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद सोडावे आणि गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे पक्षाची धुरा द्यावी, तसेच स्वत: पक्षाचे काम करत राहावे, अशी राहुल गांधी यांची योजना आहे.   

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीShobha deशोभा डेcongressकाँग्रेसTwitterट्विटर