पंतप्रधान कुणीही होवो, पण देश धर्मनिरपेक्ष आणि एकजूट राहणे महत्त्वाचे आहे. लोकशाही व्यवस्था कायम रहावी आणि निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात. आम्ही लोकशाहीसाठी, देशातील लोकांसाठी, देशाच्या हितासाठी लढत राहू. राहुल गांधी पंतप्रधान होवो अथवा न होवो, आमचा हेतू तो नाही. देश धर्मनिरपेक्ष आणि एकजूट ठेवणे आहे. असे काँग्रेसच्या महासचिव खासदार प्रियांका गांधी यांचे पती तथा उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर, बिहारमध्ये बॅलेट पेपरने पुन्हा मतदान झाले, तर निकाल बदलेला असेल, असा दावाही त्यांनी केला. ते मध्य प्रदेशातील इंदूर येथे बोलत होते.
एएनआयसोबत निवडणूक प्रक्रियेसंदर्भात बोलतान वाड्रा यांनी बिहार निवडणुकीचा उल्लेख केला. ते म्हणाले, "जर बिहारमध्ये मतपत्रिकांद्वारे (बॅलेट पेपर) पुन्हा निवडणुका घेतल्या गेल्या, तर निकाल नक्कीच बदलतील. पण, पुनर्निवडणूक होण्याची कोणतीही शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, भाजप, निवडणूक आयोग आणि संबंधित एजन्सी पुढच्या राज्यांमध्ये निवडणुकीची प्लॅनिंग करेल." तसेच, काही तरी उत्तरदायित्व निश्चित व्हायला हवे की, एका इलेक्शनमध्ये किती पैसा खर्च केला जात आहे? असाेही ते म्हणाले.
वाड्रा पुढे म्हणाले, अशा प्रकारच्या सरकारमुळे काही लोकांनाच फायदा होईल, जसे की अदानी, अंबानी आदी. सर्व बंदरे, विमानतळं अशा अनेक ठिकाणी अदानी... अदानी... दिसत आहे. हे काय आहे? महत्वाचे म्हणजे, काँग्रेस नेते राहुल गांधी देखील या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर अनेक वेला टीका करताना दिसतात.
यावेळी वाड्रा यांनी पंडित नेहरुंचाही उल्लेख केला. ते म्हणाले, नेहरूंच्या काळापासून चालत आले आहे, आघाडीतील कोताही पक्ष पुढे जावा. कुणीही पंतप्रधान व्हावे. पारदर्शक निवडणुका होणे अत्यंत आवश्यक आहे.
Web Summary : Robert Vadra emphasized national unity and fair elections, stating that who becomes Prime Minister is secondary. He suggested Bihar election results would differ with ballot voting. Vadra criticized the disproportionate benefits accruing to select individuals like Adani and Ambani under the current government.
Web Summary : रॉबर्ट वाड्रा ने राष्ट्रीय एकता और निष्पक्ष चुनावों पर जोर देते हुए कहा कि प्रधानमंत्री कौन बनता है यह गौण है। उन्होंने सुझाव दिया कि बिहार चुनाव के नतीजे मतपत्र मतदान से अलग होंगे। वाड्रा ने वर्तमान सरकार के तहत अडानी और अंबानी जैसे चुनिंदा व्यक्तियों को मिलने वाले अनुपातहीन लाभों की आलोचना की।