शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 06:44 IST

आमच्या आघाडीच्या मतांमध्ये काहीही फरक नव्हता. लोकसभा निवडणुकीत आम्हाला जितकी मते मिळाली, तितकीच विधानसभा निवडणुकीत मिळाली, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

 

नवी दिल्ली : २०२४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित आघाडीला सर्वांत मोठा विजय महाराष्ट्रात मिळाला होता; पण त्यानंतर चार महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकांत त्या राज्यात भाजपने विजय मिळविला. हा निकाल आश्चर्यकारक होता. त्या गोष्टींचा शोध घेतल्यानंतर आम्हाला लक्षात आले की, एक कोटी नवीन मतदारांनी तिथे मतदान केले होते. या मतदारांची नावे लोकसभा निवडणुकांच्या वेळी मतदारयाद्यांमध्ये नव्हती. अशा लोकांनी विधानसभा निवडणुकांत मतदान केले. ही सर्व मते भाजपकडे गेली. हे काहीतरी चुकीचेे घडत असल्याचे लक्षण आहे. जिथे-जिथे नवीन मतदारांनी मतदान केले, तिथे-तिथे भाजप जिंकला आहे. आमच्या आघाडीच्या मतांमध्ये काहीही फरक नव्हता. लोकसभा निवडणुकीत आम्हाला जितकी मते मिळाली, तितकीच विधानसभा निवडणुकीत मिळाली, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

आयोगाने सॉफ्ट कॉपी, व्हिडीओ दिले नाहीतराहुल म्हणाले की, कर्नाटकामध्ये लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला १५ ते १६ जागा मिळतील, असा आमच्या पक्षाने केलेल्या सर्वेक्षणांचा निष्कर्ष होता. आम्ही या निवडणुकांत १६ जागांवर पुढे होतो; पण प्रत्यक्षात फक्त नऊ जागा जिंकलो. आम्ही इतर जागांवर का हरलो, या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडे मतदार यादीची सॉफ्ट कॉपी मागितली; पण ती मागणी फेटाळली गेली.

महाराष्ट्रातील मोहोळ, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर यांसारख्या मतदारसंघांमध्ये मतदारांची संख्या वाढली. पण, तिथे काँग्रेस व मित्रपक्षांनीच विजय मिळवला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचे आरोप फोल ठरले आहेत. भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री

भाजपकडून लोकशाही यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. या यंत्रणा नष्ट करण्याचा त्यांचा डाव आहे.  त्यामुळे लोकशाही टिकेल का असा प्रश्न आहे. पैशाच्या बळावर भाजप गैरप्रकार करतो, त्यातून स्वत:चा फायदा करून घेतो हे अतिशय धोकादायक आहे. अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री, राजस्थान

निवडणूक आयोग मशीन-रिडेबल फॉरमॅटमध्ये मतदार यादी का देत नाही? त्याऐवजी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगत आहेत. संसदेमध्ये घेतलेल्या शपथेपेक्षा आणखी कोणती शपथ मोठी असते? आम्ही ती शपथ घेतली आहे. आमचे म्हणणे जनतेसमोर मांडले  आहे. प्रियांका गांधी, खासदार, काँग्रेस  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPriyanka Gandhiप्रियंका गांधी