कुठे गेली छप्पन इंचांची छाती?

By Admin | Updated: July 1, 2014 02:23 IST2014-07-01T02:23:14+5:302014-07-01T02:23:14+5:30

चीनकडून होणा:या सततच्या आक्रमणाला आणि पाकिस्तानकडून होणा:या शसंधीच्या उल्लंघनाला पाहता, छप्पन इंचांची छाती असलेले भैया कुठे आहेत अशी विचारणा काँग्रेसजनांनी केली आहे.

Where did the six-and-a-half-inch chest? | कुठे गेली छप्पन इंचांची छाती?

कुठे गेली छप्पन इंचांची छाती?

>नवी दिल्ली : चीनकडून होणा:या सततच्या आक्रमणाला आणि पाकिस्तानकडून होणा:या शसंधीच्या उल्लंघनाला पाहता, छप्पन इंचांची छाती असलेले भैया कुठे आहेत अशी विचारणा काँग्रेसजनांनी केली आहे. 
चीनचे आक्रमण रोखण्यासाठी आपली 56 इंचाची छाती तयार असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केले होते. मोदी 4 जुलै रोजी प्रथमच जम्मू काश्मीरच्या दौ:यावर जात असल्याच्या पाश्र्वभूमीवर ही विचारणा झाली आहे. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शकील अहमद यांनी सोशल नेटवर्किग साईट टि¦टरवर लिहिलेल्या एका नोंदीत, चीन सातत्याने आक्रमण करीत आहे व पाककडून शसंधीचे उल्लंघनही सदोदित केले जात असल्याचे म्हटले आहे. ते पाहता भारतीय नागरिकांना सरकार काही ठोस पावले उचलेल अशी अपेक्षा असून ते 56 इंचाची छाती असलेल्या भैयाकडे आशेने पाहत असल्याचे यात पुढे म्हटले आहे. किमान त्यांनी टि¦टरवर तरी काही म्हणावे असेही शकील अहमद यांनी आवाहन केले आहे. दरम्यान, पाककडून होत असलेल्या शसंधी उल्लंघनाबाबत श्रीनगरच्या बादामी बाग सेना मुख्यालयात विशेष माहिती दिली जाईल. यावेळी ले.जनरल डी.एस. हुडा यांच्यासह सेनेच्या 14 कोर, चिनार कोर व 16 कोरचे कमांडर पाक व चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती विशद करतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
मोदींच्या घोषणांवर टीका
-काँग्रेसचे नेते वारंवार मोदींच्या निवडणुकीसाठी केलेल्या घोषणांचा आधार घेत त्यांच्यावर प्रतिहल्ले चढवीत आहेत. 
-अच्छे दिन आने वाले है पासून मोदी सरकार्पयतच्या घोषणांना त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष्य बनविले आहे. 

Web Title: Where did the six-and-a-half-inch chest?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.