दप्तराचे ओझे कधी कमी होणार?
By Admin | Updated: August 7, 2015 00:06 IST2015-08-07T00:06:58+5:302015-08-07T00:06:58+5:30

दप्तराचे ओझे कधी कमी होणार?
>दप्तराचे ओझे कधी कमी होणार?हायकोर्टाचा शासनाला सवालमुंबई: दप्तराचे ओझे कमी करणारा अध्यादेश जारी झाला असला, तरी त्याची अंमलबजावणी केव्हापासून होणार आहे, असा सवाल करत याचा खुलासा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरूवारी राज्य शासनाला दिले.याप्रकरणी स्वाती पाटील यांनी जनहित याचिका केली आहे. दप्तराच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांना आजार होत असून हे ओझे कमी करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याची दखल घेत न्यायालयाने दणका दिल्यानंतर शासनाने दप्तराचे ओझे कमी करणारा अध्यादेश जारी केला. मात्र त्याची अंमलबजावणी कधी होणार याचा खुलासा शासनाने केलेला नाही. तसेच या अध्यादेशाचे पालन न करणार्या शाळांवर काय कारवाई होणार हेही शासनाने स्पष्ट केले नसल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील नितेश नेवसे यांनी न्या. व्ही.एम. कानडे व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या निदर्शनास आणले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने वरील आदेश देऊन ही सुनावणी येत्या दोन आठवड्यांसाठी तहकूब केली. (प्रतिनिधी)