शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

PoK बाबत लष्करप्रमुखांनी केले मोठे विधान, म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 14:12 IST

संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा भाग आहे असा संकल्प आपल्या संसदेने केलेला आहे.

नवी दिल्ली  - नवनियुक्त लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठे विधान केले आहे. संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असा संसदीय संकल्प आपण केलेला आहे. पीओकेभारतात आला पाहिजे अशी जर संसदेची इच्छा असेल तर त्याबाबत आम्हाला योग्य आदेश मिळाल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू, असे सूचक विधान लष्कप्रमुख मुकुंद नरवणे यांनी केले आहे.  लष्करप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या मुकुंद नरवणे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील करून घेण्याविषयी राजकीय नेतृत्वाने केलेल्या विधानाबाबत लष्करप्रमुख म्हणाले की, ''संपूर्ण जम्मू काश्मीर हा भारताचा भाग आहे असा संकल्प आपल्या संसदेने केलेला आहे. जर संसदेची इच्छा असेल तर त्याबाबत आम्हाला योग्य आदेश मिळाल्यानंतर आम्ही योग्य ती कारवाई करू,''  

यावेळी लष्करप्रमुखांनी भारतीय लष्कराच्या सज्जतेविषयीसुद्धा माहिती दिली. ''लष्कर नियंत्रण रेषेवर बऱ्यापैकी सक्रिय आहे. आम्हाला रोज विविध प्रकारची गोपनीय माहिीत मिळत असते. अशा माहितीची गंभीर दखल घेतली जाते. असा सतर्कतेमुळेच BAT या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीच्या कारवाया हाणून पाडण्यात आम्हाला यश मिळाले आहे,''असे त्यांनी सांगितले.  आता पूर्वीच्या तुलनेत भारतीय लष्कराची तयारी चांगली आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती आणि सैनिकी व्यवहार विभागाची निर्मिती एकिकरणाच्या दिशेने टाकण्यात आलेले मोठे पाऊल आहे. आता ही योजना यशस्वी व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे लष्करप्रमुख म्हणाले. तसेच पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर लष्कराचे संतुलन करण्याची आवश्यकता असल्याचेही लष्करप्रमुखांनी सांगितले.   

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPOK - pak occupied kashmirपीओके