...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 05:47 IST2024-05-07T05:47:25+5:302024-05-07T05:47:42+5:30
जोडप्यामध्ये अपंग मुलावरून सतत वाद होत होता. दोघांना आणखी एक दोन वर्षांचा मुलगाही आहे.

...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
उत्तर कन्नड : २६ वर्षीय महिलेने पतीसोबतच्या भांडणानंतर पोटच्या सहा वर्षाच्या अपंग मुलाला मगरीने तुडुंब भरलेल्या नदीत फेकल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांडेली तालुक्यात घडली. मुलाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.
जोडप्यामध्ये अपंग मुलावरून सतत वाद होत होता. दोघांना आणखी एक दोन वर्षांचा मुलगाही आहे. सावित्रीचा पती रवी कुमार मुलाच्या अपंगत्वावरून भांडत असे आणि तिने अशा मुलाला जन्म का दिला, असा प्रश्न करत असे. कधीकधी तो ‘मुलाला फेकून दे’. तो फक्त जेवायचे काम करतो, असे म्हणत असे. त्यामुळे तिने वैतागून आपल्या मोठ्या मुलाला मगरींनी भरलेल्या नदीत फेकून दिले.
मुलाचा एक हात गायब
मुलाच्या अंगावर गंभीर जखमा, मगरीने चावल्याच्या खुणा होता. त्याचा एक हात गायब होता. यावरून मगरीने मुलाची शिकार केल्याचे दिसून येते. याप्रकरणी पती आणि पत्नीला अटक करण्यात आली आहे.