शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

संपूर्ण देश सैन्यासोबत उभा; तुम्ही चीनविरोधात कधी उभे राहणार? राहुल गांधींचा मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 7:03 PM

चिनी अतिक्रमणाच्या विषयावरून मोदींकडून देशाची दिशाभूल; राहुल गांधींचा आरोप

नवी दिल्ली: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादाची माहिती दिली. पूर्व लडाखमधील तणाव, चीनकडून सुरू असलेले घुसखोरीचे प्रयत्न याची माहिती सिंह यांनी लोकसभेच्या माध्यमातून देशाला दिली. यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. 'चीनकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींनी देशाची दिशाभूल केल्याचं संरक्षणमंत्र्यांच्या विधानावरून स्पष्ट झालं आहे,' अशा शब्दांत राहुल यांनी मोदींवर थेट निशाणा साधला.संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी चीनला फटकारलं; लडाख सीमेवरील संपूर्ण स्थिती लोकसभेत मांडली'मोदींनी चीनच्या अतिक्रमणावरून देशाची दिशाभूल केल्याचं संरक्षणमंत्र्यांच्या विधानावरून स्पष्ट झालं आहे. आपला देश कायम सैन्यासोबत उभा होता, आहे आणि राहील,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तुम्ही चीनविरोधात कधी उभे राहणार आणि चीनकडून आपली जमीन कधी परत घेणार? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनीदेखील ट्विटवरून पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर हल्ला चढवला. 'राजनाथजी, देश सैन्यासोबत एकजुटीनं उभा आहे. पण चीननं आपल्या जमिनीवर कब्जा करण्याचं धाडस केलंच कसं, याचं उत्तर द्या. मोदींनी चिनी घुसखोरीबद्दल दिशाभूल का केली? चीनला आपल्या जमिनीवरून कधी पळवून लावणार?,' असा सवाल त्यांनी विचारला. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संरक्षणमंत्र्यांनी सीमेवरील तणावाची माहिती लोकसभेला दिली. यानंतर काँग्रेस खासदारांनी चर्चेची मागणी करत सभात्याग केला. काँग्रेस खासदारांना राजनाथ सिंह यांना प्रश्न विचारायचे होते. मात्र लोकसभा अध्यक्षांनी परवानगी नाकारली. त्यामुळे काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला. प्रमुख विषयांवर चर्चा करण्याची सदनाची परंपरा आहे. मात्र सरकारला प्रश्नांची भीती वाटते, अशा शब्दांत काँग्रेसनं मोदी सरकारवर निशाणा साधला.

काय म्हणाले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखला जाऊन सैनिकांची भेट घेतली. देश शूर सैनिकांच्या मागे उभा आहे असा संदेशही त्यांनी दिला होता. मीसुद्धा लडाखला गेलो, सैनिकांचे धैर्य, शौर्य आणि धाडस याचा प्रत्यय आला. कर्नल संतोषने मातृभूमीचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिले असं राजनाथ सिंह म्हणाले.चीनशी युद्ध झाल्यास शिया मुसलमान भारतासाठी प्राण देण्यासही तयार; धर्मगुरुचं पंतप्रधानांना पत्रपारंपारिक सीमेबद्दल दोन्ही देशांचे वेगवेगळे अर्थ आहेत असा चीनचा दावा आहे. १९५०-६० च्या दशकात हे दोन्ही देश याबद्दल बोलत होते पण कोणताही तोडगा निघाला नाही. चीनने लडाखमधील काही जमीन फार पूर्वी ताब्यात घेतली होती, त्याव्यतिरिक्त पाकिस्तानने पीओकेमधील काही जमीनही चीनच्या ताब्यात दिली. ही एक मोठी समस्या आहे आणि त्याचे निराकरण शांततेने व वाटाघाटीने करायला हवे. सीमेवर शांतता राखणे महत्वाचे आहे. सध्या एलएसीसंदर्भात दोन्ही देशांचे वेगळे मत आहे. शांतता कायम ठेवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये करार झाले आहेत. १९८८ पासून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधात विकास झाला. द्विपक्षीय संबंधही विकसित होऊ शकतात आणि सीमादेखील तोडगा निघू शकतो, असा विश्वास भारताला आहे. तथापि, त्याचा द्विपक्षीय संबंधांवरही परिणाम होऊ शकतो असं ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीRajnath Singhराजनाथ सिंहindia china faceoffभारत-चीन तणाव