शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

उष्णतेची लाट कधी, पाऊस कधी; आता ‘एआय’ सांगणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 9:20 AM

मशिन लर्निंगचाही होणार वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात उष्णतेची लाट कधी येणार, पाऊस कधी व किती येणार, याबाबतचा अंदाज अधिक अचूकतेने सांगण्यासाठी भारतीय हवामान शास्त्रज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व ‘मशिन लर्निंग’चा (एमएल) वापर सुरू केला आहे.हवामानाच्या अंदाजासाठी सध्या  संख्यात्मक मॉडेल वापरले जाते. पुढील काही वर्षांत एआय त्यास पूरक ठरेल, असे आयएमडी महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी म्हणाले.

१९०१ पासूनच्या नोंदी  झाल्यात डिजिटलआयएमडीने १९०१ पासूनच्या देशातील हवामानाच्या नोंदी डिजिटल केल्या आहेत आणि त्याद्वारे विश्लेषण आणि माहिती मिळवत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हवामानाचा अंदाज वर्तविणे सोपे होऊ शकते. आमचे उद्दिष्ट तालुका किंवा गावपातळीवर अंदाज देणे हे आहे. शेती, आरोग्य, शहरी नियोजन, जलविज्ञान आणि पर्यावरणातील क्षेत्र-विशिष्ट गरजांसाठी हवामान माहिती देणे यांचा त्यात समावेश आहे, असेही महापात्रा यांनी सांगितले.

मध्य भारतात उष्णतेची तीव्र लाटआयएमडीने पुढील काही दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, ओडिशा व आंध्र प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यातच देशात निवडणुका असल्याने मतदानावर परिणाम होईल का, याबाबत चिंता व्यक्त जात आहे.

‘एक देश, एक निवडणूक’साठी नियोजनnसरकार लोकसभा आणि राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या कल्पनेवर विचार करत आहे. एवढ्या मोठ्या योजनेचे नियोजन करताना अधिकाऱ्यांनी हवामानाचा अंदाज निश्चितपणे विचारात घेतला पाहिजे.nसार्वत्रिक निवडणुकीच्या काळात भारतात तीव्र उष्णता जाणवेल आणि अधिकाऱ्यांना चांगली तयारी करण्यासाठी आयएमडीचा अंदाज सहायक ठरू शकतो, असे महापात्रा यांनी सांगितले. 

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलSun strokeउष्माघात