गोवंश हत्याबंदीची अधिसूचना केव्हापासून?
By Admin | Updated: March 12, 2015 05:05 IST2015-03-12T05:05:12+5:302015-03-12T05:05:12+5:30
महाराष्ट्र गोवंश हत्याबंदीची अधिसूचना कोणत्या तारखेला जारी केली? याचा खुलासा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य शासनाला

गोवंश हत्याबंदीची अधिसूचना केव्हापासून?
मुंबई: महाराष्ट्र गोवंश हत्याबंदीची अधिसूचना कोणत्या तारखेला जारी केली? याचा खुलासा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य शासनाला दिले़बंदीनंतर खाटिक संघटनेने न्यायालयात अर्ज दाखल केला़ गोवंश हत्याबंदीची अधिसूचना जारी होण्याआधी कत्तल खान्यात आणलेले प्राणी परत नेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे़ न्या़ व्ही़ एम़ कानडे व न्या़ ए़ आऱ जोशी यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली़ प्रस्तावाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांंच्या मंजुरीनंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी गोवंश रक्षण व संवर्धन परिषदेने न्यायालयात याचिका दाखल केली़ ३ मार्चला न्यायालयाने या बंदीची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व महापालिका व पोलीस आयुक्तांना दिले़ मात्र बंदीची अधिसूचना जारी केल्याची माहिती ९ मार्चला शासनाने न्यायालयात दिली़ (प्रतिनिधी)