भारतीय चलनी नोटांवर कधी आला महात्मा गांधींचा फोटो? जाणून घ्या इतिहास...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 03:22 PM2023-10-02T15:22:48+5:302023-10-02T15:23:39+5:30

भारतीय रुपये पर महात्मा गांधी की जो तस्वीर दिखती है, वो साल 1946 में कलकत्ता में खींची गई थी.

When did Mahatma Gandhi's photo appear on Indian currency notes? Know the history | भारतीय चलनी नोटांवर कधी आला महात्मा गांधींचा फोटो? जाणून घ्या इतिहास...

भारतीय चलनी नोटांवर कधी आला महात्मा गांधींचा फोटो? जाणून घ्या इतिहास...

googlenewsNext

Mahatma Gandhi Jayanti:महात्मा गांधींचा(Mahatma Gandhi) हसतमुख चेहरा भारतीय रुपयाची ओळख आहे. पण भारतीय चलनी नोटांवर गांधीजींचा फोटो कधी आणि कसा आला? हा फोटो कुठला आहे आणि तो कोणी काढला? असे काही प्रश्न तुमच्या मनात असतील. आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. विशेष म्हणजे, स्वातंत्र्यानंतर 49 वर्षांपर्यंत महात्मा गांधींचा फोटो भारतीय चलनावर कायमस्वरुपी छापला जात नव्हता. पूर्वी नोटांवर अशोक स्तंभ असायचा.

1949 पर्यंत नोटांवर किंग जॉर्जचा फोटो
15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला, परंतु दोन वर्षांनंतरही स्वतंत्र भारताच्या चलनात कोणताही बदल झालेला नव्हता. 1949 पर्यंत नोटांवर ब्रिटनचा राजा जॉर्ज (6वा) याचे चित्र छापले जात होते. 1949 मध्ये भारत सरकारने पहिल्यांदा 1 रुपयाची नवीन नोट आणली आणि त्यावर किंग जॉर्जऐवजी अशोक स्तंभाचा फोटो छापण्यात आला.

1950 मध्ये सरकारने 2, 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा छापल्या. या नोटांवरही अशोक स्तंभाचा फोटो छापण्यात आला होता. पुढील काही वर्षे अशोक स्तंभासह भारतीय रुपयावर वेगवेगळी चित्रे छापली जात होती. उदाहरणार्थ - आर्यभट्ट उपग्रह, कोणार्क सूर्य मंदिर आणि शेतकरी.

गांधीजींचा फोटो कधी छापण्यात आला?
1969 साली पहिल्यांदाच नोटांवर महात्मा गांधींचा फोटो आला. त्यावर्षी महात्मा गांधींची 100 वी जयंती होती आणि त्यानिमित्ताने नोटांची एक विशेष मालिका बाजारात आणली होती. या सीरिजमधील नोटांवर महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाचा फोटो छापण्यात आला होता. 1987 मध्ये दुसऱ्यांदा 500 रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो छापण्यात आला.

1996 मध्ये RBI ने फोटोला कायमस्वरूपी स्थान दिले
1995 मध्ये रिझर्व्ह बँकेने चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो कायमस्वरुपी छापण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला. सरकारच्या मान्यतेनंतर 1996 मध्ये अशोक स्तंभाच्या जागी महात्मा गांधींचा फोटो असलेल्या नोटा छापल्या जाऊ लागल्या. त्यानंतरही नोटांवरुन अशोकस्तंभ पूर्णपणे काढून टाकण्यात आलेला नाही. डाव्या बाजूला लहान आकारात छापला जातो. 2016 मध्ये रिझर्व्ह बँकेने महात्मा गांधींच्या फोटोसह नोटांची नवीन मालिका सुरू केली. नोटेवर महात्मा गांधींच्या चित्रासोबत ‘स्वच्छ भारत अभियान’चा लोगोही छापण्यात आला.

नोटांवरील गांधीजींचा फोटो खरा
भारतीय नोटांवर दिसणारा महात्मा गांधींचा फोटो व्यंगचित्र किंवा चित्रण नसून मूळ फोटोचा कट आहे. हा फोटो 1946 मध्ये कलकत्ता (आता कोलकाता) येथील व्हाइसरॉयच्या घरात काढण्यात आला होता. तेव्हा महात्मा गांधी ब्रिटिश नेते लॉर्ड फ्रेडरिक विल्यम पेथिक-लॉरेन्स यांना भेटायला गेले होते. त्यांचा हा फोटो त्यावेळी काढण्यात आला होता.

Web Title: When did Mahatma Gandhi's photo appear on Indian currency notes? Know the history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.