शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Atal Bihari Vajpayee: ...जेव्हा वाजपेयींनी ममता बॅनर्जींच्या आईच्या पाया पडून घेतला होता आशीर्वाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 15:43 IST

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी अनेक जण प्रार्थना करत आहेत.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी अनेक जण प्रार्थना करत आहेत. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एम्स रुग्णालयात देशातील दिग्गज नेत्यांनी गर्दी केली आहे. तर केंद्रातील निम्मं मंत्रिमडळ रुग्णालयात आहे. वाजपेयी यांचे पुतणे अनुप मिश्रा, करुणा शुक्ला आणि कुटुंबांतील इतर सदस्यही रुग्णालयात आहेत. याचबरोबर, भाजपाशासित सर्वच राज्यांतील मुख्यमंत्री दिल्लीकडे रवाना झाले आहेत.अटल बिहारी वाजपेयी यांची राजकीय राजकीर्द अविस्मरणीय आहे. 2000 साली अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान  होते. त्यावेळी त्यांच्या कॅबिनेटमध्ये ममता बॅनर्जी यांचा समावेश होत्या. ममता बॅनर्जी यांच्याकडे तेव्हा रेल्वेमंत्रिपद होते. एक दिवस अटल बिहारी वाजपेयी कोलकात्याच्या दौ-यावर गेले होते. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या आईची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. 6 जुलै 2000मध्ये संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास वाजपेयी ममता बॅनर्जी यांच्या घरी पोहोचले. ममता बॅनर्जींचं त्यावेळी घर लहान होते. त्यामुळे ममता अटलजींना घरी बोलवण्यास टाळत होत्या. परंतु पंतप्रधान असूनही अटलजींच्या मनात कोणताही संकोच नव्हता. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई गायत्री देवींची भेट घेतली आणि जवळपास 20 मिनिटे चर्चा केली. ममता बॅनर्जी आणि त्यांच्या आईने अटल बिहारी वाजपेयी यांचे जोरदार स्वागत केले होते. तसेच गायत्री देवी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांनी एक गुलाबाचे फूल आणि शाल भेट दिली होती. या भेटीदरम्यान अटल बिहारी वाजपेयी यांनी गायत्री देवींच्या पाया पडून आशीर्वाद घेतला होता.  दरम्यान, तेव्हा या भेटीच्या चर्चेला राजकीय वळण देण्यात आले होते. ममता बॅनर्जी त्यावेळी वाजपेयी सरकारवर नाराज होत्या, असे काही जाणकारांचे म्हणणे होते. कारण वाजपेयी सरकारने तेव्हा पश्चिम बंगालमधील चार PSU (पब्लिक सेक्टर युनिट्स) बंद करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला ममता बॅनर्जी यांनी विरोध दर्शवत आपली नाराजी जाहीर केली होती. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी ममता बॅनर्जी यांची नाराजी दूर करण्यासाठी कोलकाता दौ-यावर आले होते. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी अटल बिहारी वाजपेयींचा कोलकाता दौरा व्यक्तिगत असल्याचे सांगितले होते.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयीMamata Banerjeeममता बॅनर्जीAIIMS hospitalएम्स रुग्णालयhospitalहॉस्पिटल