शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अन् मायावतींसमोर अजित सिंह यांना काढावे लागले बूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 12:46 PM

2014 च्या लोकसभा निवडणुकीत बसपाला एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र आता सपा-बसपा-आरएलडी पक्षांची आघाडी झाल्याने मायावतींचे महत्त्व वाढले आहे. या आघाडीच्या प्रचारासाठी बसपा अध्यक्षा मायावती ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत.

ठळक मुद्देसपा-बसपा-आरएलडी पक्षांची आघाडी झाल्याने मायावतींचे महत्त्व वाढले आहे. या आघाडीच्या प्रचारासाठी बसपा अध्यक्षा मायावती ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. मायावती यांच्यासोबत व्यासपीठावर बसण्यासाठी आरएलडीचे नेते अजित सिंह यांना पायातील बूट काढून व्यासपीठावर जावे लागले. व्यासपीठावर कोणी बूट घालून आलेले मायावती यांना चालत नाही, असे या को-ऑर्डिनेटरने अजित सिंह यांना सांगितले.

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीची जोरदार रंगत पाहायला मिळत आहे. सपा-बसपा आणि भाजपाने प्रचारात आघाडी घेतली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बसपाला एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र आता सपा-बसपा-आरएलडी पक्षांची आघाडी झाल्याने मायावतींचे महत्त्व वाढले आहे. या आघाडीच्या प्रचारासाठी बसपा अध्यक्षा मायावती ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. आघाडीच्या प्रचारसभा, कार्यक्रमात व्यासपीठावर कोण-कोण उपस्थित असणार, कोण केव्हा बोलणार या सर्व गोष्टी मायावती ठरवत आहेत. 

देवबंदमध्ये प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. बसपा अध्यक्षा मायावती यांच्यासोबत व्यासपीठावर बसण्यासाठी आरएलडीचे नेते अजित सिंह यांना पायातील बूट काढून व्यासपीठावर जावे लागले. मायावती यांच्यामुळेच अजित सिंह यांना बूट काढावे लागल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी सहारनपूरमधील देवबंद येथे प्रचार सभा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर मायावती आणि अखिलेश यादव बसले होते. अजित सिंह हे व्यासपीठावर चढण्याच्या तयारीत असताना बसपाचे कॉ-ऑर्डिनेटर यांनी अजित सिंह यांना पायातील बूट काढण्यास सांगितले. व्यासपीठावर कोणी बूट घालून आलेले मायावती यांना चालत नाही, असे या को-ऑर्डिनेटरने अजित सिंह यांना सांगितले. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मायावती आणि बहुजन समाजाच्या मतांची गरज लागणार आहे. त्यामुळे मायावती दुखावणार नाही, याची काळजी घेत त्यांचे काही नियम सपा आणि आरएलडीकडून पाळण्यात येत आहेत. मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असतानाही त्यांनी हा नियम बनवला होता.  कोणत्याही मंत्री किंवा अधिकाऱ्यांना मायावती यांची भेट घ्यायची असेल तर त्यांना बूट काढूनच मायावती यांच्यासमोर जावे लागत होते. मायावती यांना धुळीची अ‍ॅलर्जी असल्याने त्यांनी हा नियम तयार करण्यात आल्याचे त्यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले आहे.  

...तर मला पंतप्रधान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही- मायावतीमायावती यांनी काही दिवसांपूर्वी गौतमबुद्ध नगर लोकसभा मतदारसंघात एक रॅली केली होती. या रॅलीदरम्यान त्यांनी जनतेला संबोधित केलं. त्या म्हणाल्या, उत्तर प्रदेश राज्यानं मला साथ दिली, तर पंतप्रधान बनण्यासह लोकांच्या समस्या सोडवण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. तसेच या रॅलीदरम्यान त्यांनी गुर्जर, दलित आणि मुस्लिम मतदारांना आपलंसं करण्यासाठी अनेक आश्वासनं दिली. यावेळी त्यांनी महागठबंधनकडून स्वतः पंतप्रधानपदासाठी दावेदार असल्याचं स्पष्ट केलं होतं. 'महागठबंधनला उत्तर प्रदेशमधून चांगलं यश मिळाल्यास मला पंतप्रधान होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मी पंतप्रधान झाल्यास जनतेच्या तुमच्या समस्या चुटकीसरशी सोडवेन' असंही आश्वासनही मायावती यांनी दिलं आहे. 'देशातून मोदी आणि योगींना पळवून लावलं पाहिजे. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका, एकत्र येऊन मतदान करा. मी उत्तर प्रदेशची मुलगी आहे. तुमची बहीण आहे' असं ही मायावती यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmayawatiमायावती