शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

मुलगी शिकते तेव्हा..., ‘त्या’ वक्तव्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार वादात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 07:00 IST

नितीशकुमार यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने मौन बाळगले; परंतु शिवसेनेने मोर्चा सांभाळला.

- एस. पी. सिन्हा/आदेश रावल

पाटणा : लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महिलांमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी सभागृहात ‘सुशिक्षित महिला आपल्या पतीला संभोगाच्या वेळी ‘थांबवू’  शकते,’ असे म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. या विधानावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ झाला. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री त्यांच्या या वक्तव्यावर बॅकफूटवर आले. ते म्हणाले की, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. त्यावर टीका होत असेल तर ते आपले विधान मागे घेऊन माफीही मागतो.

बुधवारी विधानसभेचे कामकाज सुरू होताच भाजप आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. विरोधी पक्षनेते विजय सिन्हा म्हणाले की, नितीश कुमार यांनी महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. हे खूपच लज्जास्पद आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. यानंतर विरोधक हौद्यात पोहोचले आणि गदारोळ सुरू केला. तेथील टेबल आणि खुर्ची पाडली. यावर संसदीय कामकाज मंत्री विजय चौधरी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. त्यामुळे प्रकरण मिटले आहे. दरम्यान, दिल्ली भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी चाणक्यपुरी येथील बिहार भवनजवळ निदर्शने केली आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

मुख्यमंत्री म्हणाले...आम्ही स्त्री शिक्षणावर खूप भर देत आहोत. जेव्हा मुलगी शिकते तेव्हा प्रजनन दर कमी होतो. अहवालाने याची पुष्टी केली आहे. मी शिक्षणाबद्दल बोलत होतो, मात्र माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. जर मी अनौपचारिकपणे काही बोललो असेन तर मी माफी मागतो.

काँग्रेसचे मौन; सेनेने सांभाळला मोर्चानितीशकुमार यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसने मौन बाळगले; परंतु शिवसेनेने मोर्चा सांभाळला. महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा व शिवसेनेच्या राज्यसभा सदस्य खा. प्रियंका चतुर्वेदी आमने-सामने आल्या. रेखा शर्मा यांनी म्हटले की, कोणीही मुख्यमंत्री अशा भाषेचा वापर कसा काय करू शकतो? यावर प्रियंका चतुर्वेदी यांनी  म्हटले की, एक महिला असल्यामुळे मी या वक्तव्याचा निषेध करीत आहे. नितीशकुमार आपले शब्द परत घेतील, अशी मला आशा आहे. परंतु आयोगाच्या प्रमुख या नात्याने तुम्ही आम्हाला निराश केले आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार