शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

'रात्री मला भेटावं लागेल', व्हायरल व्हॉट्सअप चॅटमुळे हिमाचलच्या राजकारणात काँग्रेस-भाजपात जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 10:45 IST

Himachal Pradesh Assembly Speaker's Whats App Chat viral : हिमाचल प्रदेशमधील भाजपा नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष हंस राज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या चॅटमध्ये हंसराज यांनी एका महिलेला कामाच्या बदल्यात रात्री येण्यास सांगितले होते. तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था आपण करू, असे सांगितले.

सिमला - हिमाचल प्रदेशमधीलभाजपा नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष हंस राज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या एका स्क्रिनशॉटमुळे ते चर्चेत आले आहेत. एका महिलेसोबतचे त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चुराह येथील भाजपा आमदार आणि हिमाचल प्रदेश विधानसभेचे उपाध्यक्ष डॉ. हंसराज यांनी त्यांच्या प्रतिमा हननाचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत चंबा येथील तीसा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. तपासामधून सारे काही समोर येईल, तसेच अशा प्रकारचे प्रयत्न करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

हा स्क्रीनशॉट सर्वप्रथम युवा काँग्रेस चुराहच्या फेसबुक पेजवर अपलोड झाला होता. या स्क्रिनशॉटच्या माध्यमातून डॉ. हंसराज यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. डीएसपी मयंक चौधरी यांनी सांगितले की, तीसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. तसेच आता तपासासाठी धर्मशाला येथील फॉरेंसिक लॅबची मदत घेतली जात आहे. तिचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

या चॅटबाबत दावा करण्यात येत आहे की, हंसराज यांनी एका महिलेला कामाच्या बदल्यात रात्री येण्यास सांगितले होते. तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था आपण करू, असे सांगितले. या कथित चॅटमध्ये महिला लिहिते की, माझं काम तुम्ही करणार ना, त्यावर हंस राज यांनी सांगितलं की, तुम्ही भेटा तर आधी, सर्व होऊन जाईल. त्यावर ही महिला विचारते की, सकाळी किती वाजता येऊ, त्यावर ते सांगतात की, संध्याकाळच्या वेळी या. राहण्याचा बंदोबस्त मी करतो. त्यावर ती महिला सांगते की, संध्याकाळी येऊ शकत नाही, माझं काम झालं नाही तर, त्यानंतर हंसराज यांनी सांगितलं की, काम करेन मी, पण रात्री मला भेटावं लागेल.

दरम्यान, हिमाचल प्रदेश विधानसभेचे उपाध्यक्ष डॉ. हंसराज यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. चुराह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे कुठलाही मुद्दा उरलेला नाही. त्यामुळे ते असे हातखंडे वापरत आहेत, या प्रकरणी मी तक्राप दाखल केली आहे. तसेच लवकरच दोषींविरोधात कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, लोकमत या व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या सत्यतेला दुजोरा देत नाही.   

टॅग्स :BJPभाजपाWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपHimachal Pradeshहिमाचल प्रदेशPoliticsराजकारण