नाराजी कसली? हा तर सपाचा अंतर्गत मामला!

By Admin | Updated: June 24, 2016 00:14 IST2016-06-24T00:14:01+5:302016-06-24T00:14:01+5:30

गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेले मुख्तार अन्सारी यांचा पक्ष समाजवादी पार्टीत विलीन केल्यामुळे आपण नाराज झाल्याचे वृत्त, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी फेटाळून लावले आहे

What's upset? This is the case of SP! | नाराजी कसली? हा तर सपाचा अंतर्गत मामला!

नाराजी कसली? हा तर सपाचा अंतर्गत मामला!

लखनौ : गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेले मुख्तार अन्सारी यांचा पक्ष समाजवादी पार्टीत विलीन केल्यामुळे आपण नाराज झाल्याचे वृत्त, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी फेटाळून लावले आहे. ‘मी अजिबात नाराज नाही आणि हा समाजवादी पार्टीचा अंतर्गत मामला आहे,’ असे यादव म्हणाले.
‘कौमी एकता दलाचे (क्यूईडी) सपामध्ये विलिनीकरण करणे ही सपाची अंतर्गत बाब आहे. त्याबद्दल नाराजी नाही. हे सर्व मीडियाने निर्माण केलेले आहे,’ असे यादव यांनी स्पष्ट केले. कॅबिनेटच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
बलराम यादव यांना मंत्रिमंडळातून हटविण्यात आल्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: What's upset? This is the case of SP!