भोपाळ - नावात काय आहे? असा सवाल शेक्सपिअरने त्याच्या प्रसिद्ध नाट्यात विचारला होता. नावावरून प्रत्येक माणसाची ओळख ठरते. त्यातही कुठल्यातरी प्रसिद्ध व्यक्तीशी नामसाधर्म्य असणे हे लोक कौतुकाचा विषय समजतात. पण इंदूर येथे राहणाऱ्या एका तरुणासाठी त्याचे नावच अनंत अडचणींचे कारण ठरले आहे. त्याचे झाले असे की, इंदूरमधील अखंडनगर परिसरात राहणाऱ्या या तरुणाचे नाव राहुल गांधी असे असून, या नावामुळे त्याला साधे मोबाइलचे सीमकार्ड खरेदी करण्यापासून ते इतर छोट्यामोठी कामे करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या तरुणाने आपले आडनाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला होणाऱ्या त्रासाबाबत राहुल गांधी असे नाव असलेला हा तरुण सांगतो की, ''माझ्याकडे माझे ओखळपत्र म्हणून केवळ आधार कार्ड आहे. जेव्हा मी मोबाइलचे सीमकार्ड खरेदी करण्यासाठी किंवा अन्य काही कामासाठी ओळख म्हणून आधारकार्ड दाखवतो, तेव्हा लोक माझ्याकडे संशयाने पाहतात. माझे ओळखपत्र खोटे आहे असा त्यांचा समज होतो.''
नावात काय आहे? 'राहुल गांधी' नावाने वाढवली तरुणाची अडचण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 14:08 IST