सहकाराची ते काय काळजी घेणार? निवडणूक : बाळासाहेब थोरातांचा सवाल
By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:18+5:302015-03-06T23:07:18+5:30
संगमनेर : विरोधी उमेदवारांना सहकार माहीत नाही. निवडणूक करण्यास भाग पाडल्याने कारखान्याचे ५०-६० लाख रूपये खर्च होणार आहेत. खासगी कारखान्याची वाकली करून सभासदांच्या अन्नात माती कालविण्याचे काम करणारे विरोधी उमेदवार सहकाराची काय काळजी घेणार? असा सवाल माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केला.

सहकाराची ते काय काळजी घेणार? निवडणूक : बाळासाहेब थोरातांचा सवाल
स गमनेर : विरोधी उमेदवारांना सहकार माहीत नाही. निवडणूक करण्यास भाग पाडल्याने कारखान्याचे ५०-६० लाख रूपये खर्च होणार आहेत. खासगी कारखान्याची वाकली करून सभासदांच्या अन्नात माती कालविण्याचे काम करणारे विरोधी उमेदवार सहकाराची काय काळजी घेणार? असा सवाल माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अकोले-जवळे गटाच्या प्रचारार्थ राजापूर व जवळे कडलगच्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर शेतकरी विकास मंडळ अध्यक्ष बाजीराव खेमनर, आमदार डॉ. सुधीर तांबे, ॲड. माधव कानवडे, मधूकर नवले, मुरलीधर हासे आदी उपस्थित होते. थोरात म्हणाले, स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या शिस्तीमुळे कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. आपले सर्व उमेदवार सहकाराशी निगडीत आहेत. याउलट विरोधकांनी कुठल्याही सहकारी संस्थेत काम केलेले नाही. स्पर्धेच्या युगात टीकण्यासाठी नवीन कारखान्याच्या निर्मितीने पुढील पिढ्यांच्या जीवनात आनंद निर्माण होईल. कानवडे यांनी विरोधकांना कारखान्याची प्रगती पाहवत नसल्याने निवडणुकीच्या खर्चात पाडल्याचा आरोप केला. खेमनर यांचे भाषण झाले. यावेळी रोहिदास पवार, संतोष हासे, चंद्रकांत कडलग, बाळासाहेब गायकर, अप्पासाहेब सुर्वे, अभिजीत ढोले, सुनील हासे, माधव हासे, रोहिणी खतोडे, राजेंद्र कडलग, नितेश कडलग आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) --------सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अकोले-जवळे गटाच्या प्रचारार्थ बोलताना माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात.