शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या सरकारचे काय होणार? नितीशकुमार यांच्या कार्यक्रमांपासून तेजस्वी यादव दूर; नाराजीची होतेय चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 05:36 IST

- एस.पी. सिन्हा लोकमत न्यूज नेटवर्क पाटणा : बिहारमध्ये खेला होबे होणार का? उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव मागील १०-१५ दिवसांपासून ...

- एस.पी. सिन्हालोकमत न्यूज नेटवर्कपाटणा : बिहारमध्ये खेला होबे होणार का? उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव मागील १०-१५ दिवसांपासून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सर्व कार्यक्रमांपासून दूर राहत आहेत. जेथे नितीशकुमार असतील, तेथे तेजस्वी जात नाहीत. यामुळे राज्यात महाआघाडीमध्ये नक्कीच काही तरी सुरू आहे, अशी चर्चा आहे. आपल्याला मुख्यमंत्रिपद न दिल्यामुळे तेजस्वी यादव नाराज असल्याचे समजते. 

१२ डिसेंबर : चंपारण येथील पर्यटन विभागाच्या कार्यक्रमाला तेजस्वी यादव हजर राहिले नाहीत. १३ डिसेंबर रोजीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार, असे कार्यक्रम पत्रिकेत होते; परंतु तेजस्वी अनुपस्थित राहिले.

अनुपस्थितीत का राहिले?१३ आणि १४ डिसेंबर : पाटण्यात गुंतवणूकदारांची परिषद होती. तेथेही तेजस्वी अनुपस्थित राहिले. १५ डिसेंबर : तेजस्वी यादव एका आयटी कंपनीच्या छोट्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. १६ डिसेंबर : नितीशकुमार पाटणा येथील पीएमसीएचच्या नव्या इमारतीची पाहणी करण्यासाठी गेले होते. वास्तविक पाहता हा आरोग्य विभागाचा कार्यक्रम होता. हे खाते तेजस्वी यादव यांच्याकडे आहे; परंतु यावेळी तेजस्वी यादव आलेच नाहीत.१८ डिसेंबर : नितीशकुमार यांनी जनता दरबार घेतला. यात तीन खात्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जाणार होत्या. ही तिन्ही खाती तेजस्वी यादव यांच्याकडे आहेत. तरीही या कार्यक्रमाला उपस्थित न राहता ते दिल्लीला गेले.२१ डिसेंबर : पाटण्याच्या पशुवैद्यक महाविद्यालयातील कार्यक्रमापासूनही तेजस्वी यादव दूर राहिले. सध्या ते दिल्लीतच आहेत. त्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादव