शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे सरकार आल्यास सचिन पायलट यांचे काय हाेणार? ...तर समर्थक आमदारांच्या आकड्यांवर ठरणार खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 06:54 IST

Rajasthan Assembly Election: राजस्थानात बहुतांश एक्झिट पाेलच्या आकडेवारीनुसार काँग्रेस फार मागे नाही. त्यामुळे दाेन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत हाेऊन समान संधी मिळेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

जयपूर - राजस्थानात बहुतांश एक्झिट पाेलच्या आकडेवारीनुसार काँग्रेस फार मागे नाही. त्यामुळे दाेन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत हाेऊन समान संधी मिळेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. अशा वेळी राज्यात काँग्रेसला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्री अशाेक गेहलाेत आणि सचिन पायलट यांच्यात पुन्हा रस्सीखेच पाहायला मिळू शकते. मात्र, पायलट यांच्या वाट्याला काय येणार, याबाबत जाेरदार चर्चा सुरू आहे. 

गेल्या निवडणुकीत काँग्रेसला १०० जागा मिळाल्या हाेत्या. अशाेक गेहलाेत मुख्यमंत्री झाल्यानंतर बसपचे ६ आमदार काँग्रेसमध्ये गेले हाेते. यावेळीही काँग्रेसला बहुमत मिळाल्यास त्याचे श्रेय गेहलाेत यांनाच दिले जावे, असे मानणारा एक माेठा वर्ग आहे. सत्तेचे समीकरण बराेबरीत आल्यास बहुमतासाठी एकेक मत बहुमूल्य ठरेल. अशा वेळी पायलट यांना संधी मिळू शकते. एक्झिट पाेलनुसार राज्यात भाजपला बहुमत मिळण्याचा अंदाज आहे.

...तर पायलट यांना मिळेल संधी- गेल्या सरकारमध्ये पायलट यांना फार काही मिळाले नाही. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र, पक्ष नेतृत्त्वाने त्यांना प्रतीक्षा यादीत ठेवले.- काँग्रेसला बहुमतासाठी संघर्ष करावा लागल्यास पायलट यांना मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेण्याची संधी मिळू शकते.- पायलट समर्थक असलेले जास्त आमदार निवडल्यास पायलट यांची स्थिती मजबूत हाेईल. अशावेळी गेहलाेत यांना बॅकफूटवर जावे लागेल. - त्यासाठी पायलट यांच्याकडील आकडे फार महत्त्वाचे ठरणार आहेत. गेल्या वेळी आकड्यांची साथ नसल्यामुळे ते बंडखाेरी करून ज्याेतिरादित्य सिंधिया यांच्याप्रमाणे सरकार पाडण्याच्या स्थितीत नव्हते.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकSachin Pilotसचिन पायलटcongressकाँग्रेस