शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

बेळगावात सकाळपासूनच मतदारांच्या रांगा का लागल्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 10:36 AM

बेळगावमधील सर्वच मतदारसंघांमध्ये सकाळापासून मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. मतदानासाठीची वेळ एक तासाने वाढवूनही मतदार सकाळपासूनच मतदानाला उतरले आहेत.

बेळगावात आज सकाळपासूनच मतदानासाठी उत्साह दिसून येत आहे. सकाळी मतदान सुरु होताच मतदानाला रांगा लागल्या आहेत. बेळगावकर मराठी माणसे तशी मराठीच्या मुद्द्यावर  जागरुक असतातच. मात्सर आजच्या रांगांचे कारण वेगळे आहे. बेळगावात दुपारी पावसाची शक्यता असल्याने उगाच त्रास नको म्हणून मतदारांनी मतदानकेंद्रांकडे धाव घेतली आहे. त्यामुळे सकाळपासून बेळगावं शहरासह उपनगरात देखील रांगा वाढल्या आहेत.बेळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण 18 जागा आहेत. या १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये 37 लाख 37 हजार मतदार आहेत. त्यापैकी महिला 18 लाख 34 हजार तर पुरुष 18 लाख 88 हजार मतदार आहेत.4416 मतदान केंद्र आहेत त्यातील 836 अति संवेदनशील आहेत. या 18 मतदार संघात 203 उमेदवार रिंगणात आहेत त्यापैकी 184 पुरुष तर 19 महिला आहेत. 24288 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बेळगाव ग्रामीण मधून  एकीकरण समितीचे मनोहर किणेकर, काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर, भाजपचे संजय पाटील, बेळगावं दक्षिण समितीचे किरण सायनाक, भाजपचे अभय पाटील,कॉंग्रेसचे एम डी लक्ष्मी नारायण, मध्यवर्ती समितीचे प्रकाश मरगाळे तर खानापुरातून समितीचे विलास बेळगावकर, काँग्रेसच्या अंजलीताई निंबाळकर, जे डी एस चे नासिर बागवान,भाजपचे विठ्ठल हलगेकर,मध्यवर्ती समितीचे  अरविंद पाटील ,बेळगावं उत्तरेतून कॉंग्रेसचे फिरोज सेठ, भाजपचे अनिल बेनके, समितीचे बाळासाहेब काकतकर रिंगणात आहेत. एकीकरण समितीतर्फे दोन दोन उमेदवार उभे राहिले आहेत. सीमाभागातील चार विधानसभा मतदारसंघ मराठींसाठी महत्वाचे मानले जातात. बेळगाव उत्तर, दक्षिण, ग्रामीण, खानापूर. मात्र शक्य असूनही चारपैकी दोनच मतदारसंघात संभाजी पाटील आणि अरविंद पाटील हीच समितीची दोन मराठी माणसे आमदार म्हणून निवडून आली. आज या सर्वांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

समिती एक, उमेदवार दोन

मतदारसंघ   शहर समितीमध्यवर्ती समिती
बेळगाव दक्षिणकिरण सायनाकप्रकाश मरगाळे     
बेळगाव उत्तरबाळासाहेब काकतकरसंभाजी पाटील       
बेळगाव ग्रामीणमोहन बेळगुंदकरमनोहर किणेकर   
खानापूरविलास बेळगावकर  अरविंद पाटील       

 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८belgaonबेळगावmarathiमराठी