प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:42 IST2025-06-06T14:41:38+5:302025-06-06T14:42:47+5:30

मिनी कुत्र्याला पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे नेण्यात आले. तेथे तिच्यावर २७ तास उपचार चालले. मात्र अखेर तिचा काल मृत्यू झाला.

What is honesty Learn it from this dog He saved his owner's son without caring about his life; The snake bit him many times | प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 

प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 

उत्तर प्रदेशातील मीरत येथे एका पाळीव कुत्र्याने कुटुंबातील सदस्यांचे प्राण वाचवले. मात्र, त्या मृतत कुत्र्याने आपला जीव गमावला. मध्यरात्री झोपेत असताना एक विषारी साप घरात शिरला. पाळीव डॉगीने तो बघितला आणि जोर जोरात भुंकू लागली. यामुळे घरातील लोक जागे झाले. मात्र तोवर साप तिला अनेकवेळा चावला होता. कुत्र्याने सापाला जबड्यात धरले होते आणि तो चावत असतानाही डॉगीने त्याला सोडले नाही.

ही घटना मीरतमधील दौराला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहल्ला रामपूर येथे घडली. येथे २-३ मे रोजी रात्री ३ वाजण्याच्या सुमारास गावातील शेतकरी कल्लू यांच्या घरात एक विषारी साप शिरला होता. त्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य घरात झोपलेले होते. घरात साप शिरताना पाहून, पाळीव डॉगी मिनी त्याला भीडली. सापाने मिनीला अनेक ठिकाणी चावा घेतला. मिनीचा भुंकण्याचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्य जागे झाले आणि बाहेर येऊन बघितले, तेव्हा मिनी त्या सापाचा सामना करत होती.

मिनीने तो साप जबड्यात पकडला होता. तो साप मिनीला वारंवार चावा घेत होता. मात्र, तरीही सापाने त्याला सोडले नाही. काही वेळाने मिनी बेशुद्ध पडली आणि कुटुंबातील सदस्यांनी लोखंडी रॉडच्या सहाय्याने सापाला पकडले आणि प्लास्टिकच्या पेटीत बंद केले आणि नंतर जंगलात सोडले.

मिनी कुत्र्याला पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे नेण्यात आले. तेथे तिच्यावर २७ तास उपचार चालले. मात्र अखेर तिचा काल मृत्यू झाला. यामुळे कुटुंब दुःखी आहे. आपण जेव्हा मिनीलाला घरी आणले, तेव्हा ती केवळ एक महिन्यापेक्षाही कमी वयाची होती. अगदी घरातील सदस्यांप्रमाणेच तिचाही सांभाळ केला होता, असे संबंधित कुटुंबातील सदस्यांनी म्हटले आहे.
 

Web Title: What is honesty Learn it from this dog He saved his owner's son without caring about his life; The snake bit him many times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.