काय आहे 'जॅकूझी'? तिकडे मोदींनी संसदेत उल्लेख केला अन् इकडे लोक किंमत बघू लागले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 19:47 IST2025-02-04T19:46:51+5:302025-02-04T19:47:13+5:30
पंतप्रधानांच्या तोंडून 'जॅकूझी' हा शब्द येताच, लोकांनी त्यासंदर्भात आणि त्याच्या किंमतीसंदर्भात इंटरनेटवर शोध सुरू केला. तर आपणही जाणून घ्या, हे जॅकूझी नेमकं आहेतरी काय?

काय आहे 'जॅकूझी'? तिकडे मोदींनी संसदेत उल्लेख केला अन् इकडे लोक किंमत बघू लागले!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ मधील लोकसभेतील भाषणाची सध्या जबरदस्त चर्चा होत आहे. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी केजरीवाल यांच्यावर तेट निशाणा साधला. मोदी म्हणाले, काही नेत्यांचे जॅकूझी, स्टायलिश शॉवरवर लक्ष असते. मात्र आमचे लक्ष घरा-घरात पाणी पोहोचवण्याचे आहे. मात्र, पंतप्रधानांच्या तोंडून 'जॅकूझी' हा शब्द येताच, लोकांनी त्यासंदर्भात आणि त्याच्या किंमतीसंदर्भात इंटरनेटवर शोध सुरू केला. तर आपणही जाणून घ्या, हे जॅकूझी नेमकं आहेतरी काय?
काय आहे जॅकूझी? -
जकूझी हा एक प्रकारचा स्पा आहे, जो साधारणपणे मोठ्या बाथटबच्या स्वरूपात असतो. हा टब पाणी आणि हवेच्या प्रवाहांने आराम देण्याचे आणि तनाव कमी करण्याचे काम करतो. यात असलेले जेट्स शरीराच्या विविध भागांना लक्ष करून मसाज करत बल्ड सर्क्युलेशन वाढवते.
लक्झरी बाथरूमचा भाग -
जॅकूझीचा वापर साधारणपणे हॉटेल्स, स्पा सेंटर आणि लक्झरी घरांमध्ये केला जातो. जेथे लोक आराम आणि ताजेतवाणे वाटावे म्हणून याचा आनंद घेतात.
जॅकूझूची किंमत -
जॅकूझीची किंमत त्याचा आकार आणि फीचर्सवरून ठरते. मात्र साधारणपणे, एका साधारण जॅकूजीची किंमत ₹50,000 ते ₹1,50,000 पर्यंत असू शकते. तसेच, जर तो अधिक लक्झरी आणि विशेष फीचर्सने सुसज्य असेल, तर याची किंमत ₹5 लाख ते ₹10 लाख पर्यंतही जाऊ शकते.
जॅकूझीमध्ये आंघोळ करण्याचे फायदे? -
जॅकूझी-स्टाइल बाथ आणि स्पा बाथ एक प्रकारच्या हायड्रोथेरपीच्या स्वरुवात काम करते. जॅकूझी-स्टाइल बाथने, सांधे आणि स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो. या शिवाय, हे बाथ घेतल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि दिवसभराच्या थकव्यापासून शरीराला आराम मिळतो, हे जॅकूझीमध्ये आंघोळ करण्याचे आरोग्यदायी फयदे सांगता येतील.