जनरल पर्पज बॉम्ब म्हणजे काय? भारताने विकसित केला ५०० किलोचा महाबॉम्ब, अशी आहे संहारक क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 07:28 AM2022-04-05T07:28:07+5:302022-04-05T07:28:34+5:30

General Purpose Bomb: रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या सुरू असलेल्या युद्धामध्ये अनेक प्रकारची क्षेपणास्त्रे आणि बाॅम्बचा वापर केल्याचे निदर्शनास आले. त्यात रशियाच्या ‘फादर ऑफ ऑल बाॅम्ब’ची माेठी चर्चा झाली. भारतानेही असाच एक संहारक बाॅम्ब तयार केला आहे.

What is a General Purpose Bomb? India has developed a 500 kg giant bomb with such destructive potential | जनरल पर्पज बॉम्ब म्हणजे काय? भारताने विकसित केला ५०० किलोचा महाबॉम्ब, अशी आहे संहारक क्षमता

जनरल पर्पज बॉम्ब म्हणजे काय? भारताने विकसित केला ५०० किलोचा महाबॉम्ब, अशी आहे संहारक क्षमता

Next

रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या सुरू असलेल्या युद्धामध्ये अनेक प्रकारची क्षेपणास्त्रे आणि बाॅम्बचा वापर केल्याचे निदर्शनास आले. त्यात रशियाच्या ‘फादर ऑफ ऑल बाॅम्ब’ची माेठी चर्चा झाली. भारतानेही असाच एक संहारक बाॅम्ब तयार केला आहे. ५०० किलाे वजनाचा हा ‘महाबाॅम्ब’ आहे. शत्रू देशातील काेणत्याही विमानतळाला काही क्षणांमध्येच उद्ध्वस्त करण्याची क्षमता या महाबाॅम्बमध्ये आहे. जनरल पर्पज बॉम्ब असे याचे नाव ठेवण्यात आले आहे. असे ४८ बाॅम्ब भारतीय वायुसेनेच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.

अशी आहे बॉम्बची रचना
हा भारताचा सर्वातमाेठा बाॅम्ब आहे.
५००  किलाे वजन
१.९  मीटर लांबी
जग्वार आणि सुखोई या लढाऊ विमानांद्वारे हा बॉम्ब वाहून नेता येऊ शकतो. 

बॉम्ब बनवला काेणी?
- जबलपूरच्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये हा महाबाॅम्ब बनविण्यात आला आहे.
-  बाॅम्बची संपूर्ण रचना आणि उत्पादन याच ठिकाणी झाले आहे.

बॉम्बची कार्यपद्धती काय?
- एखादे माेठे विमानतळ काही क्षणांमध्येच पूर्णपणे उडविण्याची क्षमता या महाबाॅम्बमध्ये आहे.
- एका बाॅम्बमध्ये १५ मिमी व्यासाचे १० हजार ३०० स्टीलचे छाेटे बाॅम्ब आहेत.
- एक लहान बाॅम्ब ५० ते १०० मीटर अंतरापर्यंत विखुरला जाताे.
- प्रत्येक गाेळ्यात १२ एमएम जाडीची स्टील प्लेट भेदण्याची क्षमता आहे.
- या बाॅम्बचा प्रचंड माेठा स्फाेट हाेताे. परिणामी शत्रूचे माेठे नुकसान हाेईल.
- शत्रूची बंकर्स, रेल्वे ट्रॅक व माेठे पूल उडविण्यासाठी महाबाॅम्ब उपयाेगी


जनरल पर्पज बॉम्ब म्हणजे काय? भारताने विकसित केला महाबॉम्ब, अशी आहे संहारक क्षमता

 श

Web Title: What is a General Purpose Bomb? India has developed a 500 kg giant bomb with such destructive potential

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत