शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

काय...चीनमध्ये होतेय भारतीय नोटांची छपाई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 15:12 IST

काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी केंद्र सरकारकडे खुलासा मागितला

नवी दिल्ली : काळे धन नेस्तनाभूत करण्यासाठी केंद्र सरकारने जुन्या नोटा अचानक बंद करून अस्सल भारतीय असल्याचे सांगत नवीन, छोट्या पण विविधरंगी नोटा चलनात आणल्या. परंतू, या नोटांची छपाई भारतात होत नसून ती विदेशात म्हणजेच चीनमध्ये छापल्या जात असल्याचा अहवाल चीनच्या एका वृत्तपत्रामध्ये आल्याने खळबळ माजली आहे. यावरून काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी केंद्र सरकारकडे खुलासा मागितला आहे. 

 साधारण दीड वर्षापूर्वी नोटाबंदी करण्यात आली होती. यावेळी 500, 1000 च्या नोटा बंद करून नव्या 500 व थेट 2000 च्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. यानंतर टप्प्याटप्प्याने 50, 200 आणि 10 च्या नोटाही बदलण्यात आल्या. तसेच पुढील काही दिवसांत 100 ची नोटही चलनात येणार आहे. यावेळी सरकारकडून या नोटांची छपाई भारतात बनलेल्या कागदापासून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच या नोटा भारतातील छपाईखान्यांमध्येच छापण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. 

भारतीयांकडून चीनच्या उत्पादनांना होत असलेला विरोधाच्या पार्शभुमीवर चीनच्या वृत्तपत्रात यासंबंधीचा अहवाल छापून आल्याने खळबळ उडाली आहे. या अहवालामध्ये भारत, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया, थायलंडसह इतर अनेक देशांचे चलन चीनच्या छपाईखान्यांमध्ये छापले जात असल्याचे म्हटले आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये हा अहवाल आला आहे. हा अहवाल चीनमधील इतर देशांच्या चलनांची छपाईमुळे तेथील अर्थव्यवस्थेला मिळत असलेल्या गतीवर आहे. या संदर्भात भारत सरकारकडून कोणताही खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही.

चीनच्या या वृत्तपत्राने या संदर्भात बैंक नोट प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशनचे अध्यक्ष लियू गुशेंग यांच्या एका मुलाखतीचा हवाला दिला आहे. 1 मे रोजी दिलेल्या मुलाखतीमध्ये गुशेंग यांनी म्हटले आहे की, 2013 मध्ये चीनमध्ये विदेशी चलन छापण्यास सुरुवात झाली. आता या छपाईखान्यांमध्ये भारत, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंकेसह मलेशिया, थायलंड, ब्राझील, पोलंडसारख्या देशांची चलने छापली जात आहेत.

टॅग्स :IndiaभारतReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकShashi Tharoorशशी थरूरBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार