शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांचं काय झालं ?, शुद्धीवर येताच मेजर अभिजीत यांनी विचारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 17:27 IST

सुंजवां येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले मेजर अभिजित शुद्धीवर आले आहेत. शुद्धीवर येताच त्यांनी दहशतवाद्यांचे काय झाले, असा प्रश्न उपस्थितांना विचारला आहे.

जम्मू-काश्मीर- सुंजवां येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले मेजर अभिजीत शुद्धीवर आले आहेत. शुद्धीवर येताच त्यांनी दहशतवाद्यांचे काय झाले, असा प्रश्न उपस्थितांना विचारला आहे. शनिवारी पहाटे जम्मूतील सुंजवां इथल्या लष्करी तळावर लष्कराच्या वेषात आलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान शहीद झालेत. लष्कराच्या जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय, हा हल्ला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केल्याचं उघड झालं होतं.सुंजवां इथल्या दहशतवादी हल्ल्यात मेजर अभिजीत जखमी झाले होते. त्यांच्यावर उधमपूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे शुद्धीत आल्यावर त्यांनी परिवार किंवा इतरांबद्दल काही विचारले नाही. स्वतः हल्ल्यात किती जखमी झाले आहेत, कुठला अवयव तर निकामी झाला नाही ना, अशा प्रकारेच प्रश्न न विचारता थेट दहशतवाद्यांचं काय झालं, असं विचारल्यामुळे त्यांच्या देशप्रेमानं सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. मला आता थोटं बरं वाटतं आहे. मी वारंवार डॉक्टरांशी संवाद साधतो आहे. येत्या दोन दिवसांत मी बसायला आणि चालायला लागेन. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये काय घडतंय, याबाबत मला काहीही कल्पना नाही, असंही मेजर अभिजित म्हणाले आहेत. त्यामुळे सीमा रेषेवर दहशतवाद्यांबरोबरच शेजारील सैन्याशी लढणा-या जवानांची भावना काय असते, हेसुद्धा स्पष्ट झालं आहे.जम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला काही तासांतच दहशतवाद्यांनी काल पहाटे करणनगर येथील कॅम्पला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु सतर्क जवानांनी त्यांचा डाव उधळून लावला. त्यानंतर तिथून पळ काढणारे दहशतवादी कॅम्पजवळच्याच इमारतीत लपले असून त्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. भारतीय लष्कराने इमारतीला वेढा घातला असून ते दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहेत. पण श्रीनगरमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे जवानांचं काम आणखी कठीण झालं होतं. अखेर जवानांनी त्या दहशतवाद्यांना 30 तासांनंतर कंठस्नान घातलं आहे. 

टॅग्स :Sunjuwan attackसुंजवा दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्ला