POLL: वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानशी खेळावं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 15:19 IST2019-02-22T15:17:55+5:302019-02-22T15:19:41+5:30
केंद्र सरकारने ठोस पावलं उचलत, विविध मार्गांनी पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवातही केली आहे.

POLL: वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानशी खेळावं का?
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. 'जैश-ए-मोहम्मद'नं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या दहशतवाद्यांना पाकिस्तान पोसत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. त्यामुळेच, पुलवामा हल्ल्याचा बदला घ्यावा, पाकिस्तानला धडा शिकवावा, अशी तीव्र भावना देशभरातून व्यक्त होतेय. केंद्र सरकारने ठोस पावलं उचलत, विविध मार्गांनी पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवातही केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून, टीम इंडियाने वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानशी खेळू नये, अशी मागणी होतेय. या संदर्भात तुमचं मत काय?