पाक बोटीचे नेमके झाले काय?
By Admin | Updated: February 19, 2015 01:33 IST2015-02-19T01:33:24+5:302015-02-19T01:33:24+5:30
मी पाकिस्तानी बोट उडविण्याचा आदेश दिला होता’’, असा दावा तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी.के. लोशाली यांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे तटरक्षक दल वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

पाक बोटीचे नेमके झाले काय?
अधिकाऱ्याच्या आदेशाने वाद : संरक्षणमंत्री म्हणतात, तो आत्मघाती स्फोटच
नवी दिल्ली : ‘‘आम्ही त्यांना बिर्याणी खाऊ घालणार नव्हतो, मी पाकिस्तानी बोट उडविण्याचा आदेश दिला होता’’, असा दावा तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी.के. लोशाली यांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे तटरक्षक दल वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. दरम्यान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाकिस्तानी बोट आत्मघाती स्फोटात उद्ध्वस्त झाल्याच्या दाव्यावर सरकार ठाम असल्याचा खुलासा करतानाच त्याबाबत लवकरच पुरावे सादर करण्याची ग्वाही दिली आहे.
सरकारने ३१ डिसेंबर २०१४ च्या रात्री पाकिस्तानी बोट आत्मघाती स्फोटात नष्ट झाल्याची माहिती दिली होती. दुसरीकडे तटरक्षक दलाचे अधिकारी लोशाली यांनी मीच बोट उडविण्याचा आदेश दिल्याचा खळबळजनक दावा केल्याने आणि त्यासंबंधी ‘आॅडियो क्लीपिंग’ जारी झाल्यामुळे
या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
स्फोटात उद्ध्वस्त झालेल्या बोटीच्या चालक दलात संशयित अतिरेकी होते. त्यांनी बोटीला आग लावून स्फोट घडवून आणला असा दावा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या घटनेनंतर केला होता. मीच पाकिस्तानी बोट उडविण्याचा आदेश दिला होता, असा दावा लोशाली यांनी केल्यासंबंधी वृत्त मंगळवारी एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले. ‘‘तुम्हाला ३१ डिसेंबरची रात्र आठवत असेलच. आम्ही त्या पाकिस्तानी बोटीला उडवून दिले. त्यावेळी मी गांधीनगरला होतो. त्या रात्री मी आमच्या जवानांना आदेश दिला, बोट उडवून द्या. त्यांना बिर्याणी खाऊ घालण्याची आमची इच्छा नाही’’ असे लोशाली म्हणत असल्याचे ध्वनिफितीत ऐकायला येते. पोरबंदरपासून ३६५ कि.मी. अंतरावर अरबी समुद्रात ती पाकिस्तानी बोट आग लागून नष्ट झाली होती. अतिरेक्यांनीच स्फोट घडवून ती उडविल्याचा दावा आजवर केला जात होता.
व्हिडिओ रेकॉर्डिंग मागवणार
तटरक्षक अधिकारी लोशाली यांच्या विधानासंबंधी व्हिडिओ रेकॉर्डिंगची प्रत मागवून सोमवारपर्यंत सर्व तथ्य समोर आणले जाईल, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. देशात १५ ते १६ लाख कर्मचारी आहेत. एखादा कर्मचारी चुकीचे विधान करीत असेल तर त्यासाठी सरकारला जबाबदार धरता येणार नाही. अशा कर्मचाऱ्यावर फार तर शिस्तभंगाची कारवाई करता येते. त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही, असेही ते म्हणाले.
च्या वृत्ताबाबत तटरक्षक दलाने बचावात्मक धोरण अवलंबले असून लोशाली यांनी अशा प्रकारचे विधान केल्याचा इन्कार केला आहे. हे वृत्त सत्याला धरून नाही. या मोहिमेशी माझा कोणताही संबंध नव्हता.
च्जे काही घडले त्याची मला माहिती नाही. माझे म्हणणे विपर्यस्तरीत्या मांडण्यात आले आहे. कोणत्याही राष्ट्रविरोधी घटकांना आम्ही उल्लंघनाची मुभा देणार नाही. आम्ही त्यांना बिर्याणी खाऊ घालायला जात नाहीय, असे मी म्हणाले होतो, असा खुलासाही त्यांनी केला.
च्ते पत्रकारांना माहिती देताना म्हणाले की, ही मोहीम पूर्णपणे गोपनीय होती. त्याबाबत मला माहिती देण्यात आली नव्हती. या मोहिमेचे नेतृत्व माझे वरिष्ठ अधिकारी वायव्य क्षेत्राचे महानिरीक्षक कुलदीपसिंग श्योरन यांच्याकडे होते.
च्या घडामोडीनंतर महानिरीक्षक के.आर. नौटियाल यांनी लोशाली यांचे बयाण मिळाल्याची माहिती दिली. लोशाली यांनी अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य केल्याचा इन्कार केल्याचे त्यांनी नमूद केले.
कोणते पाप मोठे? काँग्रेसचा सवाल
च्पाकिस्तानी बोट उडविणे हे मोठे पाप आहे की देशाशी खोटे बोलणे? याबाबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आत्मचिंतन करावे असे सांगत काँग्रेसने केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. त्या बोटीत पाकिस्तानी अतिरेकी होते मग त्यांची बोट उडविण्यात लाज कसली? असा सवाल काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी टिष्ट्वटरवर केला.
च्बोटीतील संशयित अतिरेक्यांनी आत्मघाती स्फोट घडवून आणल्याच्या दाव्यावर सरकार ठाम असून त्याबात लवकरच सर्व पुरावे सादर करेल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बेंगळुरू येथे पत्रपरिषदेत स्पष्ट केले.
च्सरकार आपल्या याआधीच्या भूमिकेवर ठाम असून लवकरच त्याबाबत पुरावे सादर केले जातील. एखादा अधिकारी सरकारच्या भूमिकेशी विसंगत विधान करीत असेल तर तो शिस्तभंगाचा मुद्दा आहे. तटरक्षक दलाने बोटीला घेरल्यानंतर अतिरेक्यांनी आत्मघाती स्फोटात बोटीला उडवून दिले, असा दावा संरक्षण मंत्रालयाने त्यावेळी केला होता.