शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या हेलिकॉप्टरमधील तो ब्लॅक बॉक्स कसला? काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 20:17 IST

 लोकसभा निवडणुकाचा प्रचार ऐन रंगात आला असताना आरोप प्रत्यारोपांनाही उत आला आहे.

नवी दिल्ली -  लोकसभा निवडणुकाचा प्रचार ऐन रंगात आला असताना आरोप प्रत्यारोपांनाही उत आला आहे. दरम्यान, सध्या झंझावाती प्रचारसभा घेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केला आहे. मोदींच्या कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील दौऱ्यादरम्यान हेलिकॉप्टरमधून कथितरीत्या एक काळा बॉक्स नेण्यात आल्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे, तसेच निवडणूक आयोगाने या काळ्या बॉक्समध्ये काय होते, याचा तपास केला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केली आहे. शर्मा म्हणाले की,''कर्नाटक प्रदेश काँग्रेसने या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरसोबत तीन हेलिकॉप्टर उडत असल्याचे आम्ही पाहिले आहे. हे हेलिकॉप्टर उतरल्यानंतर  त्यातून आणलेला एक काळा बॉक्स खासगी कारमधून नेण्यात आला. की कार एसपीजी ताफ्याचा भाग नव्हती.'' तसेच मोदींनी पाच वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा हिशोब जनतेला द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.  

कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी व्हिडिओ ट्विट करून काँग्रेसने या प्रकाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती दिली. त्यांनी कर्नाटकच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना टॅग करत ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात,'' आम्ही याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. काल चित्रदुर्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरमधून एक गुढ बॉक्स बाहेर काढण्यात आला. तसेच धाईगडबडीत इनोव्हामध्ये टाकून नेण्यात आला. निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन या बॉक्समध्ये काय होते आणि इनोव्हा कुणाची होती. याची चौकशी केली पाहिजे.'' 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKarnataka Lok Sabha Election 2019कर्नाटक लोकसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस