Pandora Papers Leak : अनिल अंबानींकडे परदेशात १.३ अब्ज डॉलर्सची संपत्ती, न्यायालयाला सांगितलं होतं नेटवर्थ शून्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 10:09 AM2021-10-04T10:09:47+5:302021-10-04T10:14:47+5:30

यापूर्वी Anil Ambani आणि त्यांच्या कंपनीच्या प्रतिनिधींनी परदेशात कोणतीही संपत्ती नसल्याचा दावा न्यायालयात केला होता. जर्सी, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स आणि सायप्रस या ठिकाणी त्यांच्या किमान १८ परदेशी कंपन्या आहेत. 

What bankrupt Anil Ambani didnt tell his 1 3 billion dollar web of offshore firms | Pandora Papers Leak : अनिल अंबानींकडे परदेशात १.३ अब्ज डॉलर्सची संपत्ती, न्यायालयाला सांगितलं होतं नेटवर्थ शून्य

Pandora Papers Leak : अनिल अंबानींकडे परदेशात १.३ अब्ज डॉलर्सची संपत्ती, न्यायालयाला सांगितलं होतं नेटवर्थ शून्य

googlenewsNext
ठळक मुद्देयापूर्वी Anil Ambani आणि त्यांच्या कंपनीच्या प्रतिनिधींनी परदेशात कोणतीही संपत्ती नसल्याचा दावा न्यायालयात केला होता.जर्सी, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स आणि सायप्रस या ठिकाणी त्यांच्या किमान १८ परदेशी कंपन्या आहेत. 

पाच वर्षांपूर्वी पनामा पेपर  (Panama Paper) लीकनं जगभरातील अनेकाना मोठा धक्का दिला होता. या पेपर लीकमधून अनेक बड्या व्यक्तींच्या बनावट कंपन्या आणि कर चोरीची प्रकरणं समोर आली होती. परंतु आता पुन्हाएकदा ICIJ नं (इंटरनॅशनल कन्सोर्टिअम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट) आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. याचा पर्दाफाश केल्यानंतर भारतातील बड्या व्यक्तींनी त्यावर तोडगा काढण्यास सुरूवात केली होती.

दरम्यान, यामध्ये भारतातील उद्योगपती अनिल अंबानी यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये लंडनमधील एका न्यायालयाला आपलं एकूण नेटवर्थ शून्य असल्याचं सांगितलं होतं. चीनच्या तीन बँकांसोबत सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईदरम्यान त्यांचं हे वक्तव्य समोर आलं होतं. सुनावणीदरम्यान, न्यायालयानं अंबानी यांच्या परदेशी संपत्तीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात न्यायालयाला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. तसंच न्यायालयानं अनिल अंबानी यांना तीन महिन्यांमध्ये ७१६ दशलक्ष डॉलर्सची रक्कम देण्याचे आदेश दिले होते. परंतु अंबानी यांनी तसं न करता आपल्याकडे परदेशात कोणतीही संपत्ती नाही आणि कुठूनही कोणताही फायदाही होत नाही, असं सांगितलं होतं.

इंडियन एक्स्प्रेसद्वारे पँडोरा पेपर्सच्या तपासात रिलायन्स एडीए (Reliance ADA) समूहाचे अध्यक्ष आणित्यांच्या प्रतिनिधींकडे जर्सी, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड आणि सायप्रससारख्या ठिकाणी कमीतकमी १८ परदेशी कंपन्या असल्याचं सांगण्यात आलं आहे.
 

फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस
फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस

या कंपन्यांची स्थापना २००७ ते २०१० दरम्यान करण्यात आली होती आणि यापैकी सात कंपन्यांना गुंतवणूक आणि कर्जांमध्ये किमान १.३ अब्ज  डॉलर्स मिळाले. जर्सीमध्ये अनिल अंबानींच्या नावे बॅटिस्ट अनलिमिटेड, रेडियम अनलिमिटेड आणि ह्युई इन्व्हेस्टमेंट्स अनलिमिटेड या तीन कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांची स्थापना डिसेंबर २००७ आणि जानेवारी २००८ मध्ये करण्यात आल्याचंही इंडियन एक्स्प्रेसनं म्हटलं आहे.

कोणाकडे मालकी हक्क?
बॅटिस्ट अनलिमिटेडची मालकी रिलायन्स इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडकडे आहे, ज्याचे नेतृत्व अनिल अंबानी यांच्या मालकीच्या एडीए ग्रुप कंपनीकडे आहे. ह्यूई इन्व्हेस्टमेंट अनलिमिटेडची मालकाचं नाव एएए एन्टरप्राईज लिमिटेड आहे (जी २०१४ पासून रिलायन्स इन्सेप्टम प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जाते). याची प्रमोटर कंपनी रिलायन्स कॅपिटल आहे.

दरम्यान, रेकॉर्ड्सनुसार जानेवारी २००८ मध्ये जर्सीमध्ये दोन आणखी कंपन्यांची स्थापना करण्यात आली. समरहिल लिमिटेड आणि डलविच लिमिडेट अशी या कंपन्यांची नावं आहेत. याचे मालक हे अनूप दलाल हे आहेत. तसंच ते अनिल अंबानी यांचे प्रतिनिधीही आहेत. त्यांच्या नावे आणखी एक बीवीआय (BVI) कंपनी आहे, याचं नाव रिंडिअर डोल्डिंग्स लिमिटेड आहे. ही कंपनी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटचं काम करते. 

याशिवाय लॉरेन्स म्युच्युअल, रिचर्ड इक्विटी लिमिटेड आणि जर्मन इक्विटी लिमिटेड या तिन्ही कंपन्या जर्सीमध्ये आहेत आणि जेनेव्हाच्या एका वकिलाकडे त्याचे मालकी हक्क आहेत. रेकॉर्ड्सनुसार त्यांना सेवा देणाऱ्या सात फर्म्सना रिलायन्स/अनिल अंबानींच्या गॅरंटीवरून गुंतवणूकीसाठी कर्ज देण्यात आलं आहे. हे गुंतवणूकीचे पैसे दुसऱ्या कंपन्यांना कर्ज देऊन फिरवण्यात आले होते. 

काही प्रमुख देवाणघेवाण
इंडियन एक्स्प्रेसद्वारे करण्यात आलेल्या शोधमोहिमेत काही प्रमुख देवाणघेवाण समोर आली आहे. बॅटिस्ट अनलिमिटेड आणि रेडिअम अनलिमिटेडच्या रेकॉर्ड्सनुसार या कंपन्यांनी ५०० दशलक्ष डॉलर्स आणि २२० दशलक्ष डॉलर्सचं कर्ज आयसीआयसीआयकडून घेतलं होतं. या रकमेतून एएए कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडसाठी सीसीपीएस (कंपलसरी कन्व्हर्चटिंबल प्रेफरन्स शेअर्स) घ्यायचे होते. ही अनिल अंबानींशी निगडीत एक मुंबईतील रिअल इस्टेट कंपनी आहे. 

डलविचनं युनायटेड किंगडमच्या रॉकक्लिफ ग्रुपकडून ३३ मिलियन डॉलर्स घेतले होते. ही रक्कम सबस्क्रिप्शन अॅग्रीमेंटद्वारे मॉरिशसच्या एका प्रायव्हेट फंडद्वारे घेण्यात आली होती. या फंडनं पिपावाव शिपयार्डमध्ये आपला तीन टक्के हिस्सा विकला होता. २००९-१० पासून ती अनिल अंबानी यांच्याद्वारे प्रमोटेड रिलायन्स नेव्हलकडे आहे. 

Web Title: What bankrupt Anil Ambani didnt tell his 1 3 billion dollar web of offshore firms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.