शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बेनामी मालमत्ता म्हणजे काय? काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे

By admin | Updated: November 15, 2016 01:54 IST

नोटा बंदी निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बेनामी मालमत्तांवर टाच आणणार आहेत. मोदी यांनी रविवारी गोव्यात यासंबंधीची घोषणा केली. नवा बेनामी कायदा १ नोव्हेंबरपासून आमलात आला आहे.

नोटा बंदी निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बेनामी मालमत्तांवर टाच आणणार आहेत. मोदी यांनी रविवारी गोव्यात यासंबंधीची घोषणा केली. नवा बेनामी कायदा १ नोव्हेंबरपासून आमलात आला आहे. बेनामी मालमत्ता धारण करणारास ७ वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद त्यात आहे. दंड न भरल्यास आणखी तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यासंबंधीची ही थोडक्यात माहिती.

बेनामी मालमत्ता म्हणजे?दुसऱ्याच्या नावावर खरेदी केलेली मालमत्ता म्हणजे बेनामी मालमत्ता होय. ज्याच्या नावे ही मालमत्ता खरेदी केली जाते, त्याला बेनामदार म्हणतात. जो मालमत्तेचे पैसे दतो, तो तिचा खरा मालक असतो.

बेनामी व्यवहार म्हणजे?                                                                                                                                       बेनामी व्यवहार म्हणजे असे व्यवहार, ज्यात मालमत्ता ज्याचे नावे रजिस्टर केली जाते, ती व्यक्ती त्या व्यवहाराचे पैसे देत नाही. कोणी तरी दुसरीच व्यक्ती त्याचे पैसे अदा करते. अन्य कोणाच्या तरी फायद्यासाठी दुसराच कोणी तरी हे व्यवहार करीत असतो.

कोणते व्यवहार बेनामी नाहीत?उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांतून पत्नी अथवा मुलांच्या नावे खरेदी केलेली मालमत्ता.भाऊ, बहीण अथवा अन्य नातेवाईकांच्या नावे घेतलेली अशी मालमत्ता जिची किंमत उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांतून अदा करण्यात आलेली आहे.कुळांच्या नावे घेतलेली, पण या व्यवहारात विश्वस्त अथवा लाभधारक असलेली मालमत्ता.

बेनामी मालमत्तेत कोणकोणत्या मालमत्ता येतात?-ज्ञात स्रोताबाह्य उत्पन्नातून पत्नी व मुलांच्या नावे खरेदी केलेली मालमत्ता.- भाऊ अथवा बहिणींसोबत भागिदारीत घेतलेली अज्ञात स्रोतांच्या पैशांतील मालमत्ता.-कुळांच्या नावे घेतलेली मालमत्ता. याचा अर्थ असा होतो की, कोणी आपल्या आई-वडिलांच्या नावे मालमत्ता घेतली असेल, तर तीही बेनामी मालमत्ता होऊ शकते. कोणते व्यवहार बेनामी?चल-अचल संपत्ती, कुठल्याही प्रकारचे हक्क अथवा हित, कायदेशीर दस्तावेज, सोने, वित्तीय रोखे इ. कोणत्याही प्रकारच्या संपत्तीसाठी केलेले सर्व व्यवहार बेनामी व्यवहारात येतात.काय परिणाम होईल?सामान्य नागरिकांना, तसेच चोख व्यवहार असलेल्यांना याचा काहीही त्रास होणार नाही. काळ्या पैशातून कमावलेल्या बेकायदेशीर मालमत्ताधारकांसाठी मात्र येणारा काळ वाईट असेल.