शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

26/11चे पुरावे दिले, काय कारवाई केली?; सीतारामन यांचा पाकिस्तानला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 21:49 IST

संरक्षणमंत्र्यांकडून पाकिस्तानचा खरपूस समाचार

नवी दिल्ली: पुलवामासारखा दहशतवादी हल्ला पुन्हा होऊ नये यासाठी आवश्यक ती पावलं उचलू, असं संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं. पुलवामातील हल्ल्यानंतर आम्ही माहिती गोळा करत आहोत, असं त्या म्हणाल्या. मात्र याबद्दल अधिक काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. बंगळुरुत उद्यापासून एअर शो सुरू होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला सीतारामन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. 2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचा हात होता. त्याचे पुरावेदेखील तत्कालीन सरकारनं पाकिस्तानला दिले होते. त्याचं पाकिस्ताननं काय केलं, असा सवाल सीतारामन यांनी विचारला. 'दहा वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात होता. त्यावेळी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया भारतानं पाळली. हल्ल्यातील पाकिस्तानचा सहभाग दाखवणारे सर्व पुरावे दिले. भारतानं दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडलं. या प्रकरणाचा खटला भारतात चालवण्यात आला. कसाबला शिक्षा सुनावली गेली. मात्र पाकिस्तानच्या कनिष्ठ न्यायालयानंदेखील या प्रकरणात काहीच केलं नाही. त्यामुळे याबद्दल पाकिस्तानकडे बोलण्यासारखं काहीच नाही,' असं सीतारामन म्हणाल्या. मुंबईवरील हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारनं सर्व पुरावे पाकिस्तानला दिले. आमच्या सरकारनंही आवश्यक ते सर्व पुरावे पाकिस्तान सरकारकडे सुपूर्द केलं. मात्र त्यांनी काय कारवाई केली, असा प्रश्न संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानला विचारला. भारताकडून पाकिस्तानवर बेछूट आरोप केले जात आहेत, असा दावा इम्रान खान यांनी केला होता. याबद्दलच्या प्रश्नावर भाष्य करण्यास सीतारामन यांनी नकार दिला. संपूर्ण देशात आज संतापाची लाट आहे. प्रत्येक देशवासीयाच्या मनात प्रचंड राग आहे. हा राग व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पाकिस्तानला जे काही उत्तर द्यायचं आहे, ते आता सैन्याकडून दिलं जाईल. त्यासाठी सैन्याला संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. त्यामुळे योग्य ती कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाImran Khanइम्रान खान26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाTerror Attackदहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनPakistanपाकिस्तान