शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
2
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
3
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
4
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
5
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
6
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
7
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
8
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
9
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
10
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
11
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
12
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
13
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
14
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
15
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
16
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
17
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
18
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
19
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
20
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video

धक्कादायक! चौथीच्या दोन विद्यार्थिनींवर चार दिवस शाळेतच सातत्यानं बलात्कार, शिक्षक फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 12:32 IST

काश्मीरमधील कथुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि गुजरातमधील सूरत येथे अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनांनी देशभरात संतापाची लाट आहे. त्यातच आता पश्चिम बंगालमध्येही बलात्काराचं एक प्रकरण उघडकीस आलं आहे.

दिनाजपूर- काश्मीरमधील कथुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि गुजरातमधील सूरत येथे अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनांनी देशभरात संतापाची लाट आहे. त्यातच आता पश्चिम बंगालमध्येही बलात्काराचं एक प्रकरण उघडकीस आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये दिनाजपूर जिल्ह्यातील रायगंज भागात एका शिक्षकानं दोन विद्यार्थिनींवर सतत चार दिवस बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हे प्रकरण सरकारी प्राथमिक शाळेत झालं आहे. शुक्रवारी जेव्हा एका मुलीनं शाळेत जाण्यास नकार दिला, त्यावेळी या प्रकरणाचा उलगडा झाला.35 वर्षांचा आरोपी शिक्षक हा विवाहित असून, तो सध्या फरार झाला आहे. आरोपी शिक्षकानं दोन्ही विद्यार्थिनींवर शाळा सुटल्यानंतर चार दिवस बलात्कार केला आहे. तसेच या प्रकराची कुठेही वाच्यता केल्यात तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही त्या शिक्षकानं मुलींना दिली होती. एका मुलीच्या पालकांनी जेव्हा मुलीला शाळेत न जाण्याचं कारण विचारलं तेव्हा तिनं हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर पहिल्या पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी दुस-या विद्यार्थिनीच्या पालकांशी संपर्क साधला आणि दोघी पीडितेच्या पालकांनी राजगंज पोलिसांत आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. शनिवारी दोन्ही विद्यार्थिनींचं जिल्हा रुग्णालयात मेडिकल करण्यात आलं. 

टॅग्स :MolestationविनयभंगTeacherशिक्षक