West Bengal Election 2021 : TMC नेत्याच्या घरी सापडलं EVM, व्हिव्हिपॅट; अधिकाऱ्यांचं निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 09:25 AM2021-04-06T09:25:37+5:302021-04-06T09:27:58+5:30

निवडणूक आयोगानं केली कारवाई, एका अधिकाऱ्याचं निलंबन

west bengal third phase elections 2021 voting bjp vs tmc allegation update evm vvpat found tmc worker | West Bengal Election 2021 : TMC नेत्याच्या घरी सापडलं EVM, व्हिव्हिपॅट; अधिकाऱ्यांचं निलंबन

West Bengal Election 2021 : TMC नेत्याच्या घरी सापडलं EVM, व्हिव्हिपॅट; अधिकाऱ्यांचं निलंबन

Next
ठळक मुद्देनिवडणूक आयोगानं केली कारवाई, एका अधिकाऱ्याचं निलंबनयापूर्वी आसाममध्येही घडला होता असा प्रकार

पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. याचदरम्यान हावडा येथील उलूबेरिया नॉर्थमध्ये एका तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्याघरी ईव्हिएम मशीन आणि व्हिव्हिपॅट सापडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं. उलूबेरिया उत्तरमधून असलेले भाजपचे उमेदवार चिरेन बेरा यांनी आरोप केला की तुलसीबेरियाचे टीएमसी नेता गौतम घोष यांना लोकांनी ईव्हिएम आणि ४ व्हिव्हिपॅटसह पकडलं. त्यानंतर परिसरात तणाव पसरला असंही ते म्हणाले. त्यानंतर केंद्रीय दल आणि पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लोकांवर लाठीमारही करावा लागला. या घटनेनंतर गौतम घोष यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सुरुवातीच्या तपासात ही ईव्हीएम मशीन अतिरिक्त आरक्षित मशिनपैकी वाटत असल्याचं सांगितलं. परंतु या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे आणि याचा अहवाल लवकरच सार्वजनिक केला जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलं. या घटनेनंतर एका अधिकाऱ्याचं निलंबनही करण्यात आलं आहे. 



यापूर्वी आसाममध्येही घडला होता असा प्रकार

यापूर्वी आसाममध्येही असा प्रकार घडला होता. त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराच्या गाडीतून ईव्हिएम मशीने नेण्यावरुन तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होतं. तसंच या घटनेनं मतदानसाठी असलेल्या ईव्हिएमच्या सुरक्षेला धोका निर्माण केला आहे आणि कायदा व्यवस्थेवरही प्रतिकूल प्रभाव टाकला असल्याचं त्यांनी म्हटलं.

Web Title: west bengal third phase elections 2021 voting bjp vs tmc allegation update evm vvpat found tmc worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.