शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal SSC Scam : अर्पितानंतर आता मोनालिसा दास! पार्थ यांच्या 7 आलिशान घरांवर करतात राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 18:15 IST

मिळालेल्या माहितीनुसार, बीरभूम जिल्ह्यातील शांतिनिकेतनमधील फुलडांगा, भागात पार्थ चटर्जी यांची 7 घरे आहेत. सूत्रांनी दिदेल्या माहितीनुसार, या सर्व घरांची देखरेख त्यांची मैत्रीण मोनालिसा दास या करत होत्या.

पश्चिम बंगालमधील शिक्षक भर्ती घोटाळाप्रकरणी प्रवर्तन निदेशालय अर्थात ED ची कारवाई सुरू आहे. शुक्रवारी EDने ममता सरकारमधील मंत्री पार्थ चटर्जी यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापा टाकून 21 कोटी रुपयांहून अधिकची रोकड जप्त केली. ED ने पार्थ चटर्जी यांच्या 14 ठिकानांवर छापे टाकले आहेत. अर्पिता यांच्या घरावरील छापेमारीनंतर आता मोनालिसा दास यांच्या घरावरही ED छापा टाकू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मोनालिसा या चटर्जी यांच्या जवळच्या सहकारी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बीरभूम जिल्ह्यातील शांतिनिकेतनमधील फुलडांगा, भागात पार्थ चटर्जी यांची 7 घरे आहेत. सूत्रांनी दिदेल्या माहितीनुसार, या सर्व घरांची देखरेख त्यांची मैत्रीण मोनालिसा दास या करत होत्या. आता, पार्थ यांच्या अटकेनंतर, ED बिरभूममध्येही त्यांच्या घरांवर छापा टाकू शकते, असा अंदाज लावला जात आहे.

या भागातील लोकांचे म्हणणे आहे, की ही सर्व घरे पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चटर्जी यांची आहेत आणि ते आधूनमधून येथे येत असतात. मात्र, अधिक काळ त्यांच्या या घराची देखरेख त्यांची मैत्रीण मोनालिसा दास याच करतात. तत्पूर्वी, ED ने मंत्री पार्थ चटर्जी यांना अटक केली आहे. तर त्यांची एक जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherjee) यांना ताब्यात घेतले आहे.

याशिवाय, सुकांत आचार्य यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. शुक्रवारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरून 21 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. याशिवाय, 20 मोबाईल, मोठ्या प्रमाणावर सोनं-चांदी आणि परदेशी चलनही जब्त केले आहे. यानंतर ED ने छापेमारीचा वेग वाढवला आहे.

 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMamata Banerjeeममता बॅनर्जी