निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये विशेष गहन पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) प्रक्रिया सुरू केल्यानंतर, राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, 'हा बंगाल आहे, बिहार नाही', असे विधान केले होते. मात्र आता, येथूनच SIR च्या पहिल्या टप्प्यात तब्बल ५८ लाखांहून अधिक मतदारांची नावे उडाल्याची (वगळल्याची) धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे, ही आकडेवारी बिहारच्या तुलननेत तब्बल ११ लाखांनी अधिक आहे. बिहारमध्ये ४७ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली होती.
५८ लाख नावे म्हणजे ७.६ टक्के मतदार - निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 58 लाख नावांवर कात्री चालवण्यात आली आहे. हा आकडा बंगालच्या एकूण मतदतारांपैकी तब्बल 7.6 टक्के एवढा आहे. बंगालमध्ये एकूण मतदारांची संख्या ७.६६ कोटी एवढी आहे. या वगळलेल्या नावांमध्ये, मृत्यू, स्थलांतर झालेले, पत्ता न सापडलेले आणि दुबार नोंदी असलेल्या मतदारांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये मोठी कपात दिसून आली आहे, तसेच खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघातूनही तब्बल ४४ हजार नावे वगळण्यात आली आहेत.
दरम्यान, नावे वगळण्यापूर्वी ३१.३९ लाखांहून अधिक मतदारांची समोरासमोर सुनावणी घेण्यात आली, असा दावाही आयोगाने केला आहे. आता मंगळवारी ड्राफ्ट व्होटर लिस्ट जारी करण्यात येणार आहे. यानंतर, आक्षेप आणि दावे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होईल.
...तर पक्ष लोकशाही मार्गाने याचा तीव्र विरोध करेल -या आकडेवारीसंदर्भात प्रतिक्रिया देताना, तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कृषाणु मित्रा यांनी पक्षाकडून डेटाचे सखोल परीक्षण केले जाईल. मृत अथवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळल्यास हरकत नाही. मात्र, कोणत्याही वास्तविक मतदाराचे नाव चुकीच्या पद्धतीने वगळले गेले असल्यास, पक्ष लोकशाही मार्गाने याचा तीव्र विरोध करेल.
सर्वाधिक मतदार कमी झालेले टॉप-5 विधानसभा मतदारसंघ असे - अ. क्र. वि. मतदारसंघ वगळलेले मतदार पक्ष आमदार1. चौरंगी 74,553 तृणमूल काँग्रेस नयना बंधोपाध्याय2. बालीगंज 65,171 तृणमूल काँग्रेस बाबुल सुप्रियो3. कोलकाता पोर्ट 63,730 तृणमूल काँग्रेस फिरहाद हकीम4. भवानीपूर 44,787 तृणमूल काँग्रेस ममता बनर्जी5. श्यामपूर 42,303 तृणमूल काँग्रेस कालीदास मंडल
Web Summary : Over 58 lakh voters were removed from Bengal's electoral rolls, surpassing Bihar's numbers. Mamata Banerjee's constituency also saw significant deletions, raising concerns for TMC.
Web Summary : बंगाल की मतदाता सूची से 58 लाख से ज़्यादा वोटरों के नाम हटाए गए, जो बिहार से ज़्यादा हैं। ममता बनर्जी का निर्वाचन क्षेत्र भी प्रभावित, टीएमसी की चिंता बढ़ी।