शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
2
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
3
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
4
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
5
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
7
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
8
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
9
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
10
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
11
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
12
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
13
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
14
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
15
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
16
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
17
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
18
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
19
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
20
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?

VIDEO : 'मंत्री चालवत होते स्कूटर, मागे बसल्या होत्या मुख्यमंत्री', पेट्रोल-डिझेल दरवाढीचा असाही विरोध!

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 25, 2021 15:49 IST

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा स्कूटरवरून आपल्या कार्यालयात जाण्याचा संपूर्ण कार्यक्रम सोशल मिडियावर लाइव्ह प्रसारित करण्यात आला होता. निवडणुकीचे  वारे वाहत असलेल्या पश्चिम बंगालमध्येही सध्या पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. (protest against fuel price hike)

कोलकाता - पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerje) यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींचा अनोख्या अंदाजात विरोध केला आहे. ममता बॅनर्जी आज (गुरुवारी) कारऐवजी स्कूटरवरून आपल्या मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचल्या. त्यांची स्कूटर मंत्री फिरहाद हकीम (Firhad Hakim) चालवत होते. तर मुख्यमंत्री त्यांच्यामागे बसलेल्या होत्या. ही सामान्य स्कूटर नव्हती तर बॅट्रीवर चालणारी ग्रीन स्कूटर होती. (West bengal protest against fuel price hike CM Mamata Banerjee going to office from green scooter)

यावेळी मतता बॅनर्जींच्या डोक्यावर हेल्मेट, तोंडाला मास्क आणि गळ्यात एक बॅनर लटकलेले होते. या बॅनरवर, इंग्रजीत, "आपल्या तोंडात काय आहे, पेट्रोलची किंमत वाढवणे, डिझेलच्या किंमती वाढवणे आणि गॅसची किंमत वाढवणे," असे लिहिण्यात आले होते.

निवडणूक संपता-संपता ममता दीदीही म्हणतील 'जय श्रीराम', बंगलामध्ये दिसला अमित शाहंचा रुद्रावतार

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा स्कूटरवरून आपल्या कार्यालयात जाण्याचा संपूर्ण कार्यक्रम सोशल मिडियावर लाइव्ह प्रसारित करण्यात आला होता. निवडणुकीचे  वारे वाहत असलेल्या पश्चिम बंगालमध्येही सध्या पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. या महिन्यात येथेही पेट्रोलचे दर 100 रुपये प्रती लिटरपर्यंत पोहोचले आहेत.

तेजस्वी ट्रॅक्टरवरून विधानसभेत - यापूर्वी, आपण आंदोलक शेतकऱ्यांसोबत असल्याचे दाखविण्यासाठी बिहारमधील विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांनीही निषेध करण्याची एक अनोखी पद्धत अवलंबली होती. तेजस्वी यादव हे ट्रॅक्टर चालवत विधान सभेत पोहोचले होते. यावेळी काही लोकही त्यांच्याबरोबर ट्रॅक्टरवर होते.

"जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत भाजपाला बंगालमध्ये येऊ देणार नाही", ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

भाजपचे सोनार बांगला अभियान -पश्चिम बंगालमध्ये लवकरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यथे भाजप कंबर कसून प्रचाराच्या कामात लागला आहे. तर दुसरीकडे ममता बॅनर्जीदेखील महागाई, पेट्रोल आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. भाजपने आजपासून बंगालमध्ये सोनार बांगला अभियानाला सुरुवात केली आहे. याअंतर्गत भाजप लोकांकडून सूचना मागवणार आहे. या अभियानात सुमारे 2 कोटी सूचना घेतल्या जातील. संपूर्ण बंगालमध्ये जवळापास 30,000 सूचना पेट्या लावण्यात आल्या आहेत. तर 294 विधानसभा मतदारसंघांत जवळपास 100 पेट्या लावल्या जाणार आहेत. हे अभियान 3 मार्च ते 20 मार्चपर्यंत चालेल.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालPetrolपेट्रोलDieselडिझेलBJPभाजपाtmcठाणे महापालिका