शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा झटका; प्रणव मुखर्जींच्या मुलाचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 18:12 IST

West Bengal : अभिजित मुखर्जी यांनी सोमवारी केला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश. अतिशय दु:खद असल्याची शर्मिष्ठा मुखर्जी यांची प्रतिक्रिया.

ठळक मुद्देअभिजित मुखर्जी यांनी सोमवारी केला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश. अतिशय दु:खद असल्याची शर्मिष्ठा मुखर्जी यांची प्रतिक्रिया.

काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील भाजपच्या काही जणांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आता तृणमूल काँग्रेसनं काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सुपुत्र अभिजित मुखर्जी यांनी सोमवारी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर हे अतिशय दु:खद असल्याची प्रतिक्रिया त्यांची बहिण शर्मिष्ठा मुखर्जी यांनी दिली. परंतु त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये कोणत्याही घटनेचा उल्लेख केला नाही. 

अभिजित मुखर्जी यांनी कोलकात्यातील तृणमूल भवनात उपस्थित राहत पक्षप्रवेश केला. यादरम्यान, तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय आणि ज्येष्ठ मंत्री पार्थ चटर्जी उपस्थित होते. अभिजित मुखर्जी होती २०१२ आणि २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावरून खासदार झाले होते. परंतु २०१९ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. "ममता बॅनर्जी यांनी ज्याप्रकारे भाजपची सांप्रदायिक लाट रोखली, मला विश्वास आहे ती अन्य लोकांच्या सहकार्यानं देशातही हे करू शकतील," अशी प्रतिक्रिया टीएमसीमध्ये सामील झाल्यानंतर अभिजित मुखर्जी यांनी दिली. यापूर्वी गेल्याच महिन्याच टीएमसीनं भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिलेल्या मुकुल रॉय यांचीही घरवापसी करवली होती. भाजपसाठी बंगालमध्ये तो मोठा झटका होता. 

बनावट लसीकरण प्रकरणात ममतांची बाजूपश्चिम बंगालमध्ये बनावट लसीकरण प्रकरण समोर आलं होतं. यावेळीही अभिजित मुखर्जी यांनी ममता बॅनर्जी यांची बाजू घेतली होती. "कोणत्याही व्यक्तीच्या चुकीसाठी पश्चिम बंगाल किंवा ममता बॅनर्जी यांना चुकीचं ठरवणं योग्य नाही. जर असं असेल तर मेहुल चोक्सी, नीरव मोदी आणि विजय माल्ल्या यांच्याशी निगडीत प्रकरणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरलं जाऊ शकतं," असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं होतं. 

टॅग्स :All India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसPranab Mukherjeeप्रणव मुखर्जीMamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगाल