शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

West Bengal Election : पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी TMC च्या कार्यालयात स्फोट; कार्यकर्ते जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 20:06 IST

West Bengal Election 2021: शनिवारी पार पडणार आहे पहिल्या टप्प्यातील मतदान

ठळक मुद्देशनिवारी पार पडणार आहे पहिल्या टप्प्यातील मतदान तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये शनिवारी विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. मतदानापूर्वी बांकुडा येथील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार या स्फोटात तृणमूल काँग्रेसचे चार कार्यकर्ते जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या स्फोटानंतर त्या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसही त्या ठिकाणी पोहोचले आहेत.बांकुरा येथील जॉयपूर येथे शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर तृणमूल काँग्रेसकडून भाजपवर आरोप करण्यात आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार होत असलेला पाहून मला अतिव दु:ख झालं आहे. पश्चिम बंगाल आणि कोलकाता पोलिसांनी योग्य ती पावलं उचलावी आणि कायद्यानुसार कारवाईदेखील करावी, अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी दिली. प्रशासन आणि पोलिसांनी राजकीय तटस्थता टिकवून ठेवणं आणि कायद्याप्रती वचनबद्ध राहणं आवश्यक आहे. कायद्याचं उल्लंघन केल्यास संबंधितांना शासन केलं जाईल, असंही त्यांनी नमूद केलं.शनिवारी पहिल्या टप्प्यातील मतदानदरम्यान, शनिवार, २७ मार्च रोजी पश्चिम बंगालमधील पाच जिल्ह्यातील एकूण ३० विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील ६, पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील ७, झाडग्राम जिल्ह्यातील ४ तर पुरुलिया जिल्ह्यातील ९, बाकुंडा जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, यात ७३ लाख ८० हजार ९४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत असणार आहे.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१All India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिस