ममता बॅनर्जींची भविष्यवाणी! 2024 मध्ये भाजप सत्तेत येणार नाही; सांगितलं- कोण बनवणार सरकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 16:53 IST2022-07-21T16:52:18+5:302022-07-21T16:53:24+5:30
"ममता म्हणाल्या, "2024 च्या लोकसभा निवडणुकीत जनता भाजपला केंद्रातील सत्तेतून पाय उतार करेल. भाजपने देशातील संस्था उद्ध्वस्त केल्या आहेत."

ममता बॅनर्जींची भविष्यवाणी! 2024 मध्ये भाजप सत्तेत येणार नाही; सांगितलं- कोण बनवणार सरकार
आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळणार नाही. तसेच, इतर पक्ष एकत्रित येऊन सरकार स्थापन करतील, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. त्या कोलकातामध्ये शहीद दिनाच्या रॅलीला संबोधित करत होत्या.
ममता म्हणाल्या, "2024 च्या लोकसभा निवडणुकीत जनता भाजपला केंद्रातील सत्तेतून पाय उतार करेल. भाजपने देशातील संस्था उद्ध्वस्त केल्या आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांची कसलीही भूमिका नव्हती, आज ते देशाचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत. 2024 मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवले जाईल. त्यांचा पराभव होईल. भाजपला स्वबळावर बहुमत मिळणार नाही, असे मी ठामपणे सांगतो."
भाजपच्या कैदेतून बाहेर पडण्याचे जनतेला आवाहन -
ममता म्हणाल्या, भाजपला बहुमत मिळाले नाही, तर इतर पक्ष एकत्रित येऊन सरकार स्थापन करतील. भाजपच्या कैदेतून मुक्त व्हा. 2024 मध्ये जनतेचे सरकार आणा.' एवढेच नाही, तर बॅनर्जी यांनी, अन्नधान्य, दाळ आणि पीठासारख्या खाद्य पदार्थांच्या 25 किलोग्रॅम पेक्षा कमीच्या पॅकेट्सवर जीएसटी लावण्याच्या केंद्राच्या निर्णयाला जनविरोधी म्हटले आहे.
महाराष्ट्राप्रमाणे षडयंत्र केल्यास चोख प्रत्युत्तर मिळेल -
यावेळी, भाजपला इशारा देत मुख्यमंत्री म्हणाल्या, जर भाजपने बंगालमध्ये महाराष्ट्राप्रमाणे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना चोख प्रत्युत्तर मिळेल.