पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारण तापलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या बांकुडा आणि बिष्णुपूर या दोन संघटनात्मक जिल्ह्यांच्या अध्यक्षांनी वेगवेगळ्या व्यासपीठांवरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. काहींनी निवडणुकीनंतर भाजपा कार्यकर्त्यांना भागातून हाकलून देण्याचा इशारा दिला, तर काहींनी निवडणुकीनंतर 'बघून घेण्याची' धमकी दिली. दुसरीकडे भाजपाने या धमक्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
बांकुडा येथील तलडांगरा येथे झालेल्या पक्षाच्या एका बैठकीत तृणमूल काँग्रेसचं बांकुडा संघटनात्मक जिल्हा अध्यक्ष ताराशंकर रॉय यांनी भाजपा कार्यकर्त्यांना इशारा दिला. ते म्हणाले, “जे लोक भाजपाला भडकवत आहेत, त्यांना निवडणुकीनंतर समजेल… जर तुम्ही भाजपाचं नाव घेतलं, तर त्यांना त्याची फळं भोगावी लागतील.”
रविवारी संध्याकाळी बांकुडा येथील कोतुलपूर येथे पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना, बिष्णुपूर संघटनात्मक जिल्हा अध्यक्ष सुब्रत दत्ता यांनी स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांना इशारा दिला. ते म्हणाले, “भाजपा कोतुलपूरमध्ये वाढायला नको आहे. २०२६ च्या निवडणुकीत त्यांना पराभूत करावं लागेल आणि या भागातून बाहेर काढावं लागेल.”
“जर तुम्ही उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेलात तर तुम्हाला मारहाण केली जाते, मग तुम्ही या बंगाली लोकांकडे मतं मागायला कसे काय येता? तुम्हाला लाज वाटली पाहिजे. बंगालचे लोक भाजपाला अजिबात मतदान करणार नाहीत. भविष्यात भाजपाला मत देणाऱ्यांचं काय होतं, हे आम्ही पाहूच.”
तृणमूलच्या या हल्ल्याला भाजपाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. बांकुडा येथील भाजप आमदार नीलाद्री शेखर दाना म्हणाले की, “तृणमूल काँग्रेस घाबरलेली आहे. जर भाजपाने आपल्या पद्धतीने राजकारण सुरू केलं, तर तृणमूलचे अस्तित्व धोक्यात येईल.” २०२१ च्या गेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी तृणमूलला बांकुडा जिल्ह्यातील १२ पैकी ८ जागांवर पराभवाचा सामना करावा लागला होता.
Web Summary : West Bengal's political climate intensifies as TMC leaders warn BJP supporters of consequences post-election, including expulsion. BJP retaliates, claiming TMC is scared and faces potential downfall. The 2021 election saw TMC losing in Bankura.
Web Summary : पश्चिम बंगाल में टीएमसी नेताओं ने भाजपा समर्थकों को चुनाव बाद परिणाम भुगतने और निष्कासन की चेतावनी दी, जिससे राजनीतिक माहौल गरमा गया है। भाजपा ने पलटवार करते हुए कहा कि टीएमसी डरी हुई है और पतन का सामना कर सकती है। 2021 के चुनाव में बांकुरा में टीएमसी को हार का सामना करना पड़ा।