West Bengal election 2021 Sitaram yechury attacked on bjp and tmc in kolkata | "...तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी करूशकतात भाजपशी हात मिळवणी"; मोठ्या नेत्याचा दावा!

"...तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी करूशकतात भाजपशी हात मिळवणी"; मोठ्या नेत्याचा दावा!

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे नगारे वाजायला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्ष आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवताना आणि मतदारांना आपल्याकडे आकर्षित करताना दिसत आहेत. अनेक नेते आपल्या रॅलीतून मतदारांना आश्वासन देत आहेत, दावे करत आहेत. यातच सीपीआय (एम) सरचिटणीस सीताराम येचुरी (Sitaram yechury) यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. (West Bengal election 2021 Sitaram yechury attacked on bjp and tmc in kolkata)

एका रॅलीला संबोधित करताना पंतप्रधा मोदींवर प्रश्न उपस्थित करत सीताराम येचुरी म्हणाले, ''भ्रष्टाचाराविरोधात आवाज उचलतात आणि मोदी आपल्या नावाने गुजरातमध्ये क्रिकेट स्टेडियम बनवतात. वंशवादाविरोधात बोलतात आणि अमित शाहंचे पुत्र जय शाह तेथील क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. हे लोक भ्रष्टाचारात पूर्णपणे बुडालेले आहेत.''

"...व्यक्तीला अभिमान असायला हवा"; काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्यानं थेट जम्मू-काश्मिरात केली PM मोदींची तारीफ!

सीपीएम सरचिटणीस सीताराम येचुरी म्हणाले, ''आरएसएस-भाजपच्या सांप्रदायिक कारवाया रोखण्यासाठी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सर्वप्रथम तृणमूल काँग्रेसचा पराभव करावा लागेल. एवढेच नाही, तर त्यांनी दावा केला, की राज्यात त्रिशंकू विधानसभा झाल्यास ममता बॅनर्जीच्या नेतृत्वाखालील पक्ष सरकार बनविण्यासाठी पुन्हा एनडीएमध्ये सामील होऊ शकतो.''

टीएमसी आणि भाजपमध्ये सुरू असलेली राजकीय रस्सीखेच म्हणजे 'नूराकुश्ती' असल्याचे येचुरी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर भाजप कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी तयार केलेल्या 'पीएम केअर्स' फंडाचा वापर निवडणुकीदरम्यान नेत्यांना 'विकत' घेण्यासाठी करत आहे, असा गंभीर आरोपही येचुरी यांनी यावेळी केला.

...अन् मन की बातमध्ये मोदींनी दिलं 'त्या' प्रश्नाचं उत्तर, 'ही' गोष्ट न शिकल्याची व्यक्त केली खंत

''दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर शेतकरी मोदी सरकारच्या नीतीविरोधात आंदोलन करत आहेत. जे शेतकरी आपल्याला भोजण देतात, ते अशी लढाई लढू शकतात, तर आपणही येथे असे करू शकतो,'' असे येचुरी म्हणाले.

पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वबूमीवर ब्रिगेड परेड ग्राउंड येथे सीपीएम आणि काँग्रेसच्या एका संयुक्त रॅलीला संबोधित करताना, ''डाव्या आणि धर्मनिरपेक्ष शक्तींची ही आघाडी राज्यात भ्रष्ट तृणमूल काँग्रेस सरकार आणि भाजपचा पराभव करण्यासाठी आणि उत्कृष्ट बंगालसाठी लढेल,'' असे येचुरी म्हणाले.

तब्बल १५ वर्षे पैकीच्या पैकी जागा जिंकणाऱ्या पक्षानं भाजपची साथ सोडली; काँग्रेसशी 'हात'मिळवणी

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: West Bengal election 2021 Sitaram yechury attacked on bjp and tmc in kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.