शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

महिलांना नोकरीत ३३ टक्के आरक्षण, CAA लागू होणार; प. बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 21:00 IST

west bengal election 2021: भाजपने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी संकल्प पत्र जाहीर केले आहे.

ठळक मुद्देपश्चिम बंगालसाठी संकल्पपत्र जाहीरसोनार बांगलाचे स्वप्न पूर्ण करणार - अमित शहामहिलांना आरक्षण, सीएए, एम्स, शेतकऱ्यांना वाढीव मदत सारख्या अनेक घोषणा

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (west bengal election 2021) मतदानाचा पहिला टप्पा २७ मार्च रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून, भाजप (BJP) आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहेत. अशात आता भाजपने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी संकल्प पत्र जाहीर केले आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करण्यात येईल, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. (west bengal election 2021 bjp leader amit shah release election manifesto)

भारतीय जनता पक्षाकडून घोषित करण्यात आलेल्या संकल्पपत्रात आश्वासनांचा पिटारा असल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे हे संकल्पपत्र म्हणजे सोनार बांगला करण्याचा उद्देश असल्याचे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी स्पष्ट केले. 

महिलांना आरक्षण आणि सीएए

पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार आल्यास महिलांसाठी सरकारी नोकरीत ३३ टक्के आरक्षण देण्यात येईल. तसेच बंगलामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्यात येईल. शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून प्रतिवर्षी मिळणाऱ्या ६ रुपयांमध्ये राज्य सरकारकडून ४ हजार रुपयांची भर घालण्यात येईल. तसेच मत्स्योद्योग करणाऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये देण्यात येईल, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहेत. 

राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल; RSS ला विश्वास

तीन एम्स, सीमा सुरक्षेवर भर

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार आल्यास तीन एम्स रुग्णालये उभारण्यात येतील. मुख्यमंत्री शरणार्थी योजनेअंतर्गत प्रत्येक शरणार्थीला पाच वर्षापर्यंत डीबीटीतून १० हजार रुपये दरवर्षी देण्यात येतील. पहिल्या मंत्रिमंडळात बंगालच्या नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजना लागू करण्यात येण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच बंगालच्या सर्व सीमा सुरक्षित करण्यात येतील, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. 

शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ बंगालमधील शेतकऱ्यांना देण्यात येईल. याशिवाय ७५ लाख शेतकऱ्यांना १८ हजार रुपये देण्यात येतील. आतापर्यंत ही रक्कम देण्यात आलेली नाही. मात्र, भाजप सत्तेत आल्यानंतर ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असे आश्वासनही या संकल्पपत्रात देण्यात आले आहे. 

"एरव्ही ट्विटरवर सक्रीय असणाऱ्या मोदींनी आसाम महापुरावर एक चकार शब्द काढला नाही"

सोनार बांगलासाठी संकल्पपत्र

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेले संकल्पपत्र सोनार बांगलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून घोषणापत्र केवळ नावासाठी राहिले होते. मात्र, भाजपचे सरकार विविध राज्यांत स्थापन झाल्यापासून घोषणापत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण भाजपकडून देण्यात आलेले आश्वासन पूर्ण झाल्याचे जनतेने पाहिले आहे, असे अमित शहा यांनी यावेळी नमूद केले. भाजपचे सरकार आल्यास केंद्र आणि राज्य मिळून सोनार बांगलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे काम करतील. आध्यात्मिक, विज्ञान, सामाजिक सुधारणा, शिक्षण, कला, साहित्य, संगीत या क्षेत्रात पुन्हा एकदा पश्चिम बंगाल आघाडीवर येईल, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Amit Shahअमित शहाBJPभाजपाPoliticsराजकारण