शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

INDIA आघाडीत बिघाडीची शक्यता;CPM की TMC? एकाची करावी लागेल निवड, तृणमूलचा काँग्रेसला अल्टीमेटम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 16:40 IST

टीएमसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने नरमाईची भूमिका घेतली असतानाही, काँग्रेसकडून टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव तथा पक्षाचे लोकसभा सदस्य अभिषेक बॅनर्जी यांना निशाणा केले जात असल्याने तृणमूल काँग्रेसचे नेतृत्व नाराज आहे.

पश्चिम बंगाल कांग्रेस आणि टीएमसी यांच्यात सध्या जबरदस्त खटके उडताना दिसत आहेत. प्रकरण एवढे तापले आहे की, तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) आपण अथवा सीपीआय (एम)च्या नेतृत्वाखालील डाव्यांपैकी कुणा एकाची निवड करावी, असा मेसेज काँग्रेसला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षांतर्गत सूत्रांनी शनिवारी यासंदर्भात माहिती दिली. 

टीएमसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने नरमाईची भूमिका घेतली असतानाही, काँग्रेसकडून टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव तथा पक्षाचे लोकसभा सदस्य अभिषेक बॅनर्जी यांना निशाणा केले जात असल्याने तृणमूल काँग्रेसचे नेतृत्व नाराज आहे.

‘अभिषेक बॅनर्जी प्रदेश काँग्रेसच्या निशाण्यावर’ -सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘काँग्रेस नेते सी. वेणुगोपाल यांच्यासह इंडिया आघाडीतील घटकंनी अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत एकता दाखवूनही राज्यातील काँग्रेस नेत्यांनी आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत.’ महत्वाचे म्हणजे, टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांना 13 सप्टेंबरला झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होता आले नव्हते. कारण त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते.

काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने ठरवावे -पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने आणि राज्य मंत्रिमंडळातील सदस्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, सीपीआय (एम)ची तर राजकीय मजबुरी आहे. पण प्रदेश काँग्रेसचे नेते या लाईनवर का चालत आहेत? अशा स्थितीत, पश्चिम बंगालमध्ये आमच्या सोबत जायचे की, सीपीआय (एम) सोबत, हे काँग्रेस नेतृत्वाला ठरवावे लागले. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसTrinamool Congressतृणमूल काँग्रेस