शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

...तर जेलमध्ये राहणं पसंत करेन, ममता बॅनर्जींचा केंद्रावर थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 16:50 IST

पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा जागांवर पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.

 मिदनापूर -पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कृषी कायद्यांवरून पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. ममतांनी म्हटले आहे, की भाजप सरकारने लवकरात लवकर कृषी कायदे परत घ्यावेत. अथवा सत्ता सोडावी. पश्चिम मिदनापूर येथे एका रॅलीला संबोधित करताना ममता म्हणाल्या, ‘‘बीजेपीच्या वाईट कारभारावर शांत रहण्याऐवजी अथवा ते सहन करण्याऐवजी, जेलमध्ये राहणे पसंत करेल.’’

ममतांनी दावा केला, की ‘‘भाजप सरकारने लवकरात लवकर कृषी कायदे परत घ्यावेत अथवा सत्ता सोडावी. शेतकऱ्यांच्या अधिकारांवर घाला घातल्यानंतर सत्तेत राहणे योग्य नाही.’’ भाजपला ‘‘बाहेरील लोकांचा पक्ष’’ म्हणत ममतांनी, त्या बंगालमध्ये कधीही भगव्या पक्षाचा कब्जा होऊ देणार नाही, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर लोकांनाही आवाहन केले, की त्यांनीही अशा प्रयत्नांना विरोध करावा.

त्या म्हणाल्या, त्यांचा पक्ष तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास, पुढच्या वर्षी जून महिन्यानंतरही मोफत रेशन देण्यात येईल. पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा जागांवर पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.

...त्यांनी तृणमूल सोडले तरी चालेल; निवडणुकीआधी ममता बॅनर्जींनी भरला दम -तत्पूर्वी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील स्थानिक पक्ष असलेल्या तृणमूलमध्ये पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. एक आमदार आधीच भाजपात डेरेदाखल झाला. तर काही दिवसांपूर्वी पक्षाचे संस्थापक सदस्यांपैकी एक आणि ममतांचे मंत्री अधिकारी यांनी राजीनामा दिला होता. त्याच्यासोबतची शिष्टाई यशस्वी ठरल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षातील नेत्यांना दम भरला होता.

ममता यांनी पक्षाच्या कोणत्याही नेत्याचे नाव न घेता, जे लोक पक्ष विरोधी कारवाया करत आहेत, विरोधी पक्षाच्या संपर्कात आहेत ते पक्ष सोडण्यासाठी स्वतंत्र आहेत, असे म्हटले होते. ममता यांनी नाव घेतले नसले तरीही त्यांचा हा इशारा नाराज असलेले नेते शुभेंदू अधिकारी आणि पक्षाच्या विरोधात बोलणारे काही नेते, आमदार यांच्यासाठी होता.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाFarmer strikeशेतकरी संप