शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

ममतांचा मोदी सरकारला टोला; म्हणाल्या- राज्यांना लशी देणं जमेना, डिसेंबरपर्यंत देश कसा करणार व्हॅक्सिनेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 17:38 IST

ममता म्हणाल्या, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासोबत माझे बोलणे झाले आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांशीही माझे बोलणे झाले. केंद्र सरकारने सर्व राज्यांना मोफत लशी पुरवायला हव्यात. यावर सर्वांची सहमती आहे.

कोलकाता - बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी ममतांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून मोदींवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार बऱ्याच गोष्टी सांगत असते, पण होत नाहीत. वचनबद्धता असायला हवी. संपूर्ण देशाला लस देणे मोठे काम आहे. राज्यांना तर लस देणं जमेना, अशात डिसंबरपर्यंत संपूर्ण देशाला कसे व्हॅक्सिनेट करणार? दिल्लीतून बरंच काही बोललं जातं, पण होत नाही. (West Bengal CM Mamata attack on modi govt said unable to give vaccine to the states)

ममता बॅनर्जी बुधवारी पत्रकार परिषदेत म्हणाल्या, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासोबत माझे बोलणे झाले आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांशीही माझे बोलणे झाले. केंद्र सरकारने सर्व राज्यांना मोफत लशी पुरवायला हव्यात. यावर सर्वांची सहमती आहे.

अलपनवर म्हणाल्या, चॅप्टर क्लोज -पत्रकार परिषदेदरम्यान अलपन बंदोपाध्याय यांच्यासंदर्भात ममतांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी चॅप्टर क्लोज झाला आहे, असे उत्तर दिले. पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलपन बंदोपाध्याय राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सल्लागार झाले आहेत.

West Bengal: भाजपा टेन्शनमध्ये; 8 जिंकलेले-हरलेले आमदार, खासदार ममतांकडे परत जाण्याच्या तयारीत

तृणमूल काँग्रेस सोडून गेलेले घरवापसीच्या रांगेतपश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमाेर पक्ष साेडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची लाट राेखण्याचे एक माेठे आव्हान हाेते. मात्र, ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत माेठा विजय मिळवला आणि चक्र उलटे फिरू लागले. भाजपमध्ये गेलेले अनेक नेते तृणमूल काँग्रेसमध्ये परत येण्यासाठी रांगेत उभे आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसमधून ममतांचे अनेक विश्वासू नेते भाजपमध्ये गेले. मात्र, २ मे राेजी मतमाेजणीनंतर चित्र पालटले. तृणमूल काँग्रेसने २९२ पैकी २१३ जागा जिंकून सत्ता कायम राखली. आता अनेक जण घरवापसीसाठी प्रयत्न करत असून त्यांनी ममतांना पत्र पाठवून पक्षात पुन्हा प्रवेश देण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या