ममतांचा मोदी सरकारला टोला; म्हणाल्या- राज्यांना लशी देणं जमेना, डिसेंबरपर्यंत देश कसा करणार व्हॅक्सिनेट?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 05:37 PM2021-06-02T17:37:48+5:302021-06-02T17:38:49+5:30

ममता म्हणाल्या, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासोबत माझे बोलणे झाले आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांशीही माझे बोलणे झाले. केंद्र सरकारने सर्व राज्यांना मोफत लशी पुरवायला हव्यात. यावर सर्वांची सहमती आहे.

West Bengal CM Mamata attack on modi govt said unable to give vaccine to the states  | ममतांचा मोदी सरकारला टोला; म्हणाल्या- राज्यांना लशी देणं जमेना, डिसेंबरपर्यंत देश कसा करणार व्हॅक्सिनेट?

ममतांचा मोदी सरकारला टोला; म्हणाल्या- राज्यांना लशी देणं जमेना, डिसेंबरपर्यंत देश कसा करणार व्हॅक्सिनेट?

googlenewsNext

कोलकाता - बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी ममतांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून मोदींवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार बऱ्याच गोष्टी सांगत असते, पण होत नाहीत. वचनबद्धता असायला हवी. संपूर्ण देशाला लस देणे मोठे काम आहे. राज्यांना तर लस देणं जमेना, अशात डिसंबरपर्यंत संपूर्ण देशाला कसे व्हॅक्सिनेट करणार? दिल्लीतून बरंच काही बोललं जातं, पण होत नाही. (West Bengal CM Mamata attack on modi govt said unable to give vaccine to the states)

ममता बॅनर्जी बुधवारी पत्रकार परिषदेत म्हणाल्या, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासोबत माझे बोलणे झाले आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांशीही माझे बोलणे झाले. केंद्र सरकारने सर्व राज्यांना मोफत लशी पुरवायला हव्यात. यावर सर्वांची सहमती आहे.

अलपनवर म्हणाल्या, चॅप्टर क्लोज -
पत्रकार परिषदेदरम्यान अलपन बंदोपाध्याय यांच्यासंदर्भात ममतांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी चॅप्टर क्लोज झाला आहे, असे उत्तर दिले. पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलपन बंदोपाध्याय राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सल्लागार झाले आहेत.

West Bengal: भाजपा टेन्शनमध्ये; 8 जिंकलेले-हरलेले आमदार, खासदार ममतांकडे परत जाण्याच्या तयारीत

तृणमूल काँग्रेस सोडून गेलेले घरवापसीच्या रांगेत
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमाेर पक्ष साेडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची लाट राेखण्याचे एक माेठे आव्हान हाेते. मात्र, ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत माेठा विजय मिळवला आणि चक्र उलटे फिरू लागले. भाजपमध्ये गेलेले अनेक नेते तृणमूल काँग्रेसमध्ये परत येण्यासाठी रांगेत उभे आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसमधून ममतांचे अनेक विश्वासू नेते भाजपमध्ये गेले. मात्र, २ मे राेजी मतमाेजणीनंतर चित्र पालटले. तृणमूल काँग्रेसने २९२ पैकी २१३ जागा जिंकून सत्ता कायम राखली. आता अनेक जण घरवापसीसाठी प्रयत्न करत असून त्यांनी ममतांना पत्र पाठवून पक्षात पुन्हा प्रवेश देण्याची विनंती केली आहे.

Web Title: West Bengal CM Mamata attack on modi govt said unable to give vaccine to the states 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.