west bengal bjp supporters raise slogan desh ke gaddaron ko goli maaro during rally | VIDEO: देश के गद्दारो को, गोली मारो ***को; भाजपच्या रोड शोमध्ये वादग्रस्त घोषणा

VIDEO: देश के गद्दारो को, गोली मारो ***को; भाजपच्या रोड शोमध्ये वादग्रस्त घोषणा

हुगळी: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे. तृणमूलच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर सत्ता कायम राखण्याचं आव्हान आहे. तर ममता यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी गेल्या काही दिवसांत बंगालचे दौरे केले आहेत.

राजकीय वातावरण तापलं असताना आता पक्षांकडून वापरल्या जाणाऱ्या भाषेचा दर्जा घसरू लागला आहे. काल तृणमूलच्या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी वादग्रस्त घोषणा दिल्यानंतर आज भाजप कार्यकर्त्यांनी रॅलीमध्ये वादग्रस्त घोषणाबाजी केली. तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या शुभेंदू अधिकारी यांच्या रॅलीमध्ये या घोषणा देण्यात आल्या. 'देश के गद्दारों को गोली मारो ***को' अशा घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या. हुगळीतल्या चंदननगरमध्ये शुभेंदु अधिकारी यांचा रोड शो होता.
काहीच दिवसांपूर्वी ममता बॅनर्जींनी आपण नंदिग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. नंदिग्राममध्ये भाजपनं तृणमूलला खिंडार पाडलं आहे. त्याच मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची घोषणा ममता यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना शुभेंदु अधिकारी यांनी नंदिग्राममध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. 'भाजपच्या तिकिटावर नंदिग्राममधून लढणाऱ्या उमेदवाराच्या विजयाची जबाबदारी मी घेतो. ममता दीदींनी ६२ हजार मतांवर विश्वास दाखवत निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पण माझ्याकडे जय श्रीरामची घोषणा करणारे २.१३ लाख लोक आहेत,' असं म्हणत अधिकारी यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: west bengal bjp supporters raise slogan desh ke gaddaron ko goli maaro during rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.